Video : विडिओ रेकॉर्ड करत असताना तलावात दिसली हालचाल , बघता बघता त्या तरुणाने तडफडत सोडला जीव

विडिओ

। नमस्कार ।

हिमाचल प्रदेशामधील लाहोर स्पीतिमधील चंद्रताल तलाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तिथे पर्यटक ये-जा करत असतात. या तलावात पोहण्यास सक्त मनाई आहे. हे तलाव बाहेरुन लहान वाटत असल तरी खूप खोल असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पर्यटकांना तलावामध्ये आत जाण्यास आणि पोहोण्यास मनाई आहे.

मात्र तरीही अनेक पर्यटक नियमांना पायदळी तुडवून पोहोण्यासाठी त्या तलावात जातात. असाच एक प्रकार घडला आणि यात ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे तो सध्या वायरल होत आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे ही व्यक्ती बुडत असताना अनेक पर्यटक तलावाच्या काठाजवळ उभे होते. मात्र कोणीच त्याला वाचवण्यासाठी पुढे जाऊ शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेला एक पर्यटक तलावाच्या काठावरुन व्हिडीओ रेकॉर्ड करीत होता.

दरम्यान एक व्यक्ती त्या तलावाच्या मध्यभागी बुडत असल्याचं त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झालं. तेथे उभे असलेल्या काही नागरिकांनी त्याला वाचविण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र त्याचा जीव ते वाचवू शकले नाही.


या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, काही वेळाने अस्सल पट्टीदार पोहणारा तेथे आला व त्याने पहिल्याच प्रयत्नात मृतदेह बाहेर काढला. या मृत व्यक्तीचं नाव राहुल ठाकूर असल्याचं समोर आलं आहे. ही व्यक्ती कुल्लू या गावात राहत होता. राहुल आपल्या चार मित्रांसोबत चंद्राताल फिरण्यासाठी आला होता.

22 जुलै रोजी सकाळी आंघोळ करण्यासाठी राहुल तलावात गेला तो परत स्वतःच्या पायाने आलाच नाही. राहुलचा मृतदेह तलावापासून 20 फूट अंतरावर होता. तरी हे तलाव जवळपास 18 फूट खोल असल्याचं सांगितलं जात आहे. गोताखोराने मृतदेह बाहेर काढला. आणि यानंतर पोलिस घटनास्थळी पोचून त्यांनी त्या राहुलचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला आहे.

पर्यटनाच्या अश्या ठिकाणी वारंवार अशा घटना समोर येत आहेत. सध्या पावसाचं उधान असल्याने अशा प्रकारे धाडस करणं स्वतःच्याच जीवावर बेतू शकतं. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी पर्यटनासाठी गेल्यावर नको ते धाडस करू नये. अन्यथा त्याचे भयावह परिणाम भोगावे लागू शकतात.

बघा विडिओ :

सोर्स :- लोकमत

Leave a Reply

Your email address will not be published.