। नमस्कार ।
आपल्या देशात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा, रूढी-परंपरा आणि मनाच्या समजूती आहेत. अशाच अनेक परंपरा पाऊस पाडण्यासाठी आपल्या देशात केल्या जातात. मध्य प्रदेशाच्या विदिशा जिल्ह्यातून आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे. इथे सरपंचाने पावसाच्या देवाला म्हणजेच इंद्रदेवाला आनंदी करण्यासाठी चक्क गाढवाची सवारी केली. जेणेकरून इंद्र देवाने कृपा करावी आणि या ठिकाणी चांगला पाऊस पडावा. सध्या सोशल मीडियावर गाढवावरून मिरवणूक काढणाऱ्या या सरपंचाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेश मध्ये अनेक भागांमध्ये तितकासा समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे तेथील शेतकरी लोक चिंतेत दिसत आहेत आणि वेगवेगळे पर्याय करून पाहत आहेत. अशातच मध्य प्रदेश मधील विदिशा जिल्ह्यातील रंगई गावात पावसासाठी एक अनोखी सवारी काढण्यात आली.
यात त्या गावचे सरपंच सुशील वर्मा हे कसलीही लाज न बाळगता गाढवावर बसून संपूर्ण गावभर फिरले. यात त्या गावातील बरीच लोकं, महिला आणि लहान मुलंही सहभागी झाले होते. त्या गावातील लोकांनी त्यांच्या सरपंचांच स्वागतही केलं. सरपंच गाढवावर तर त्यांच्यासोबतचे लोकं बँड-बाजा वाजवत नाचत-गात पुढे चालत होते. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ही सवारी त्यांच्या पटेल बाबा देवस्थान इथून सुरू होऊन गणेश मंदिरापर्यंत पोहोचल्यावर तिथे उपस्थित लोकांनी चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. सरपंच सुशील वर्मा यांचं असं म्हणणं आहे, की त्या ग्रामीण भागात असं मानतात , की गावाच्या सरपंचानं गाढवाची सवारी केल्यास इंद्रदेव प्रसन्न होतात आणि चांगल्या प्रमाणात पाऊस होतो. याच कारणामुळे त्यांनी गाढवाची सवारी ही कसलीही लाज न बाळगून पूर्ण केली, कारण त्या गावच्या जनतेच्या सुखात आणि दुःखात सहभागी होणं हे एका प्रमुखाचं कामच आहे अस देखील ते म्हणाले. याच कारणामुळे आपण गाढवाची सवारी करून इंद्रदेवा जवळ प्रार्थना केली अस त्यांनी म्हटलं.
सरपंचाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोकं हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करत आहेतच त्याचबरोबर यावर मजेशीर , चांगल्या प्रतिक्रिया ही देत आहेत. काही लोकांनी यावर memes बनवले आहेत तर काहींनी हे देशभरात सगळीकडे केलं गेलं पाहिजे, असं म्हटलं आहे. जेणेकरून पूर्ण देशातच चांगला पाऊस व्हावा.
बघा विडिओ इथे :-