VIDEO: अचानक मंडपात स्टेजवरच नवरदेवानं नवरीला उचलून घेतलं अन्.. ते दृश्य पाहून पाहुणेही झाले चकित

विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडियावर खूपवेळा लग्नसमारंभातील तऱ्हेतऱ्हेचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. काही त्या मजेशीर व्हिडिओमध्ये नवरदेव स्टेजवरच कोसळतो तर काही व्हिडिओमध्ये नवरीची मस्ती पाहायला मिळते. लग्नातील विनोदी आणि काही चकित करणारे व्हिडिओ सतत व्हायरल झाल्याचे आपण सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

लग्न समारंभाच्या वेळी बरेचदा नवरदेव आणि नवरीहीएकमेकांसोबत मस्ती करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ वायरल होत असून तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

नवरी आणि नवरदेव बऱ्याच लग्नात लाजताना दिसतात. पण काही जोडपी एकदम न लाजता एकदम बिनधास्त आपलं लग्न एन्जॉय करत असतात. सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यात नवरदेवानं केलेल्या कृत्यामुळे नवरी लाजून स्टेजवरच ती आपला चेहरा लपवू लागली.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, की नवरी आपल्या घरच्यांसोबत उभी असते इतक्यात नवरदेव तिथे येतो आणि नवरीला खांद्यावर उचलून घेतो. यानंतर तो तिला शेजारीच असलेल्या सोफ्यावर बसवतो. नवरदेवाच्या या कृत्यामुळे नवरी लाजते. नवरीला जराही कल्पना नव्हती की नवरदेव असं काही करणार आहे.


सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं, की हा पूर्णतः चित्रपटांचा परिणाम आहे. आणखी एका यूजरनं म्हटलं, की इतकी काय घाई होती. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

बघा विडिओ :

Leave a Reply

Your email address will not be published.