.
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने पंख्याला ग’ळफास लावून आपले जीवन संपवले. तीने स्वतःचा एक फोटो देखील इन्स्टाग्राम वर शेअर केला आहे, ज्यामध्ये तीने एक भावूक कॅप्शन लिहिले आहे. टीव्ही सीरियल ‘दास्तान- ए- कुबूल’मध्ये मरियमची भूमिका साकारणाऱ्या 20 वर्षीय तुनिशा शर्माने आपले जीवन संपवले. तीने मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये पंख्याला ग’ळफास लावून आ त्मह’त्या केल्याची बातमी समोर आली आहे.
या दु:खद बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे, कारण मृ’त्यूच्या सुमारे 6 तास आधी तुनिषाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता आणि त्या फोटो मध्ये ती इतकी काही खुश दिसत नाहीये. तसेच तिचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला असून या व्हिडिओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे आणि फोटोमध्ये तिने मोटिव्हेशन कॅप्शन लिहिले आहे.
तुनिषा ६ तासांपूर्वी मेकअप करत होती :- तुनिशा शर्माचा शेवटचा व्हिडिओ (Tunisha sharma last video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती सेटवर दिसत आहे. ती तिच्या मेकअप रूम मध्ये दिसत असून तिची मेकअप ची तयारी सुरू असताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला मेकअप आणि हेअरस्टाइलची संपूर्ण टीम आहे. शूटिंगपूर्वी ती तयार होत आहे, तसेच टीमशी संवाद साधत आहे. मात्र, ती खूश नसल्याचे तीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते.
तुनिशा ने शेयर केली भावनात्मक पोस्ट :- तुनिशा शर्मानेही 6 तासांपूर्वीचा तिचा फोटो शेअर केला होता. यामध्ये ती स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जे त्यांच्या पॅशनने प्रेरित आहेत, ते थांबत नाहीत.’
View this post on Instagram
सहा तासात अस काय झालं? तुनिषाच्या मृ’त्यूच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की 6 तासात असे काय घडले की तूनिषाने आपले जीवन संपवले. तुनिशा आता या जगात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे तिचे चाहते सांगत आहेत!
#TunishaSharma का आखिरी वीडियो, सुसाइड करने से कुछ घंटे पहले टीवी शो के सेट पर मेकअप करवा रही थीं एक्ट्रेस pic.twitter.com/Q5E3XQtobE
— NBT Entertainment (@NBTEnt) December 24, 2022
मालिकांपासून चित्रपटांमध्ये काम केले :- 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये जन्मलेल्या तुनिषाने सोनी टीव्हीवरील सीरियल ‘महाराणा प्रताप’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. तीने चक्रवर्ती अशोक सम्राटमध्येही अभिनय केला होता. 2016 मध्ये तीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तुनिषाने ‘फितूर’ या मालिकेत लहान कतरिना कैफची भूमिका साकारली होती.
त्याच वर्षी तीने ‘बार बार देखो’ आणि ‘कहानी 2’ मध्येही काम केले. 2017 मध्ये तुनिषाने ‘शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंह’मध्ये काम केले होते. 2018 ते 2019 पर्यंत तिने कलर्स टीव्ही शो ‘इंटरनेट वाला लव’ मध्ये आद्या वर्माची भूमिका साकारली होती.
‘अली बाबा’ मध्ये तुनिषा मुख्य भूमिकेत होती :- 2019 मध्ये, तुनिशा झी टीव्हीवरील ‘इश्क सुभान अल्लाह’ या मालिकेत दिसली होती. 2021 मध्ये, तीने SAB टीव्हीच्या शो ‘हीरो-गैब मोड ऑन’ च्या सीझन 2 मध्ये काम केले. यावेळी ती ‘अली बाबा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तिच्या विरुद्ध काम करत होता शीझान मोहम्मद खान.