‘हे’ आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वात महागडे व ‘ब्रँडेड’ 5 लग्न, पहा ‘या’ जोडीच्या लग्नात केला होता पाण्यासारखा ‘पैसा’ खर्च…

बॉलिवूड

.

प्रत्येकजण आपल्या लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. लग्नाला कोणाच्याही आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान असतं. या दिवसानिमित्त लोकांना अनेक शुभेच्छा मिळत असतात. हा क्षण कायमचा संस्मरणीय व्हावा यासाठी माणसाला सर्वतोपरी प्रयत्न करायचे असतात. लग्नात सर्वजण खुलेआम खर्च करत असले तरी सामान्य माणसाला खर्चाबाबत मर्यादा असतात. त्यांच्याकडे प्री-सेट बजेट असल्यामुळे असे लोक मर्यादेत खर्च करतात.

पण जर आपण सेलिब्रिटी आणि उद्योगपतींच्या लग्नाबद्दल बोललो तर इथले प्रत्येक लग्न हे रॉयल असते. इथे पैशाची कमतरता नसते आणि मोठे लोक लग्नात खूप पैसा खर्च करतात. आज आपण अशाच काही लग्नांबद्दल बोलणार आहोत जे खूप शाही असल्यामुळे चर्चेत होते. या विवाहसोहळ्यांमध्ये खूप पैसा खर्च झाला. कोणते आहेत ते लग्न, जाणून घेऊया.

1) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी :-

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा शाही विवाह 2009 मध्ये झाला होता. जसे आपणास सर्वांना माहीत आहे की राज कुंद्रा एक यशस्वी आणि श्रीमंत उद्योगपती आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2004 मध्ये राज कुंद्राने ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत 198 व्यक्तींमध्ये स्थान मिळवले होते. राज हे लंडनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे प्रमुख व्यावसायिक आहेत.

या दोघांच्या लग्नात करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. सजावटीशिवाय शिल्पाच्या हिरे आणि पाचूपासून बनवलेल्या दागिन्यांवर सर्वाधिक पैसा खर्च करण्यात आला. बातम्यांनुसार, शिल्पाच्या एंगेजमेंट रिंगची किंमत 5 को’टी आहे. त्यांचे लग्न खूप भव्य होते. त्यांच्या लग्नात जवळपास 50 को’टी रुपये खर्च झाले होते.

2) मल्लिका रेड्डी आणि सिद्धार्थ रेड्डी :-

मल्लिका आणि सिद्धार्थ रेड्डी यांनी जून 2011 मध्ये लग्न केले होते. मल्लिका रेड्डी ही GVK ग्रुपचे मालक कृष्णा रेड्डी यांची नात आहे तर सिद्धार्थ रेड्डी हा इंदू ग्रुपचे मालक इंदुकुरी श्याम प्रसाद रेड्डी यांचा मुलगा आहे. या भव्य विवाहासाठी 5000 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. या लग्नाला भारतातील सर्व उद्योगपती आणि मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. हे लग्न हैदराबादमध्ये झाले आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या लग्नात सुमारे 100 को’टी रुपये खर्च करण्यात आले होते.

3) ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन :-

अशा प्रकारेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचेही लग्न पार पडले. त्यांचे लग्न आजही लोकांना आठवते. 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले. या लग्नात करोडो रुपये खर्च करण्यात आले. हे लग्न ज्यांनी कुणी पाहिलं ते बघतच राहिलं होते. बच्चन कुटुंबीयांनी लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. ऐश्वर्याच्या साडीपासून ते दागिन्यांपर्यंत सगळ्याची किंमत क’रोडोंची होती.

या लग्नात सजावटीपासून ते खाण्या पिण्यापर्यंत सर्व काही फर्स्ट क्लास होते. लग्नात पाण्यासारखा पैसा वाया गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या लग्नात जवळपास 80 को’टी रु’पये खर्च करण्यात आले होते.

4) अमित भाटिया आणि वनिषा मित्तल :-

भारतातील रहिवासी असलेल्या वनिषा मित्तलने इन्व्हेस्टमेंट बँकर अमित भाटियासोबत लग्न केले. वनिषा भाटिया ही उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची मुलगी आहे. दोघांचाही साखरपुडा शिव पॅलेस ऑफ वर्सेल्स मध्ये झाला होता. इथे एंगेजमेंट झाल्यानंतर दोघांनीही त्याच पॅलेसमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. या शाही लग्नात सुमारे 350 को’टी रु’पये खर्च करण्यात आले होते. लग्नाला सर्व बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

5) सहारा वेडिंग :-

या यादीत सहारा इंडिया ग्रुपचे मालक सुब्रतो रॉय यांच्या दोन्ही मुलांचे नाव येते. सुब्रतो रॉय यांना सीमांतो रॉय आणि सुशांतो रॉय अशी दोन मुले आहेत. दोघांनी एकाच मंडपात एकत्र लग्न केले होते. हा विवाह लखनऊमध्ये झाला असून हा विवाह आजपर्यंतच्या सर्वात महागड्या विवाहांमध्ये गणला जातो. या विवाह सोहळ्यात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. हा भव्य विवाह 2004 साली संपन्न झाला आणि या लग्नात सुमारे 552 को’टी रु’पये खर्च करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.