नमस्कार
चेहऱ्याला सुंदर ठेवण्यासाठी लोक काय काय नाही करत . पौष्टिक आहार आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. पौष्टिक आहार केवळ शरीरास आतून मजबूत बनवत नाही तर त्वचेला सुंदर बनवण्यात देखील महत्वाची भूमिका बजावतो.
सोबतच शरीरातील अनेक प्रकारचे विकार दूर करण्यात पौष्टिक रस महत्वाची भूमिका निभावतत्. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ज्यूस विषयी माहिती देणार आहोत जी चमकत्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
गाजर आणि बीटचा रस :- गाजर आणि बिटचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट, झिंक, फॉलिक ऍसिड, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन सी यासह अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. बीटरूटमध्ये असलेले हे सर्व पोषक रक्त शुद्ध करण्यासाठी ओळखले जातात, जे चमकत्या त्वचेसाठी खूप महत्वाचे व फायदेशीर आहेत.
गाजरातील व्हिटॅमिन ए आपल्या त्वचेवरील मुरुमांपासून आणि सुरकुत्यापासून बचाव करण्यात महत्वाची भूमिका बजावते. हा रस त्वचेला चमकदार व सुदंर बनविण्यात खुप मदत करतो.