.
सिमा अवॉर्ड्स कार्यक्रमात रणवीर सिंग अचानक पोहोचला, त्यामुळे रेड कार्पेटवर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत रणवीरने चाहत्यांसोबत सेल्फी काढायला सुरुवात केली. मात्र यादरम्यान रणवीर सिंगच्या गालावर दुरूनच एक थप्पड पडली आहे.
रणवीर सिंगला अचानक बसली चपराक : शनिवारी बंगळुरूमध्ये 10 व्या दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे (SIIMA) मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. सुपरस्टार यश, अल्लू अर्जुन, कमल हासन आणि विजय देवरकोंडा यांसारखे दक्षिणेतील स्टार्स या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.
तर त्याचवेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनेही या कार्यक्रमात धमाकेदार एन्ट्री घेतली. दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अचानक पोहोचलेल्या रणवीर सिंगला त्याच्या चाहत्यांनी घेरले. या गर्दीत रणवीरला थप्पडही खावी लागली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे.
रणवीर सिंग अचानक साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड इव्हेंटमध्ये पोहोचला, त्यामुळे रेड कार्पेटवर खूप गर्दी झाली होती. यादरम्यान अभिनेत्याचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होते. रणवीर सिंगनेही चाहत्यांना निराश न करता या गर्दीत चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली.
मात्र यादरम्यान झालेल्या धक्का बुक्कीत रणवीरच्या गालावर जोरदार थप्पड मारली जाते. खरंतर, सेल्फी काढताना रणवीर सिंगच्या अंगरक्षकांनी त्याला घेरलं, पण तरीही लोक ऐकत नव्हते. त्यानंतर त्याच्या अंगरक्षकाने लोकांना हाकलण्यासाठी हात वर केला, त्यानंतर तो हात रणवीर सिंगच्या चेहऱ्यावर गेला व रणविरच्या गालावर जोरदार थप्पड त्याच्याच अंगरक्षकडून पडते.
यानंतर रणवीर त्याचा गाल चोळू लागतो. थप्पड मारल्यानंतर रणवीर सिंगची प्रतिक्रिया देखील खूप विचित्र दिसत होती परंतु त्याने रागावर नियंत्रण ठेवत एक मजेदार प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#RanveerSingh got shocked by the action of his bodyguard. Watch the video to know more. 😮👇🏻 #SIIMAawards2022 #SIIMAawards pic.twitter.com/lcN6eVBXiS
— Pinkvilla (@pinkvilla) September 11, 2022
SIIMA ने आपल्या 10 व्या दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला पॅन इंडियन सुपरस्टार या पदवीने सन्मानित केले आहे. त्याचवेळी रणवीर सिंगने या शीर्षकाचे श्रेय त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दिले. रणवीर सिंगच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.