.
अंबानींच्या धाकट्या मुलाचे लग्न राधिका मर्चंटसोबत होणार आहे. राधिका मर्चंट दिसायला खूप सुंदर आहे. राधिका तिचे आयुष्य अतिशय साधेपणाने जगते आणि खूप सुंदर आणि करोडपती असूनही तिला श्रीमंती दाखवणे अजिबात आवडत नाही.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे बालपणीचे मित्र आहेत. पण हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटला बॉलिवूडचे सर्व स्टार्स आणि मोठे उद्योगपती पोहोचले होते.
राधिका मर्चंटच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर राधिका मर्चंटकडे करोडोंची मालमत्ता आहे आणि तिचे वडील कोट्यवधींचे मालक आहेत. राधिका मर्चंटचे वडील अब्जाधीश उद्योगपती बीरेन मर्चंट, भारतातील आघाडीची औषध कंपनी Inco Health Care चे CEO आहेत आणि राधिका ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे.
राधिका मर्चंटही खूप आलिशान आयुष्य जगते. वृत्तानुसार, तीच्याकडे सुमारे 10 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्याचवेळी तीच्या वडिलांकडे सुमारे 755 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वीरेन मर्चंट हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत.
राधिकाने तिचे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण मुंबईतील श्री निभा आर्ट अकादमीमध्ये गुरु भावना ठक्कर यांच्या अंतर्गत पूर्ण केले आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मे 2022 मध्ये त्यांच्या भावी धाकट्या सून राधिका मर्चंटसाठी अरंगेत्रम समारंभाचे आयोजन केले होते.