.
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. मात्र, घटस्फोटाच्या वृत्तावर आतापर्यंत सानिया आणि शोएबने त्यांच्या वतीने काहीही सांगितलेले नाही. दरम्यान, सानिया आणि शोएबच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा, भारत आणि पाकिस्तानमधील सर्वात प्रिय जोडपे घटस्फोटाच्या मार्गावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. या जोडप्याने 12 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली
दरम्यान, सानिया मिर्झा आणि तिचा क्रिकेटर पती शोएब मलिक यांनी त्यांच्या नवीन प्रोजेक्ट ‘द मिर्झा मलिक शो’ची घोषणा केली आहे. हा शो लवकरच पाकिस्तानी स्ट्रीमिंग सर्व्हिस ‘उर्दूफ्लिक्स’वर येणार आहे. उर्दूफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शोचे पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीर गुंतागुंत मिटल्यानंतर सानिया आणि शोएब त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा करू शकतात. ब्रेकअपपूर्वी शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यात अनेक करार आहेत जे त्यांना एकत्र पूर्ण करायचे आहेत.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी एप्रिल 2010 मध्ये लग्न केले. त्यांना आता इझान मिर्झा मलिक हा चार वर्षांचा मुलगा आहे. हे जोडपे दुबईत राहतात.
शोएब मलिकने सानिया मिर्झावर लग्नात फसवणूक केल्याचे वृत्त आहे. शोएबचे मॉडेल आयेशा उमरसोबतच्या अफेअरमुळे सानियाने 12 वर्षांचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे.