सानिया मिर्झा शोएब मलिक एकमेकांपासून होणार वेगळे ? घटस्फोटावर सानियची पोस्ट चर्चेत, म्हणाली आता अल्लाहच…! चाहत्यांनी केले ट्रोल…

बॉलिवूड

.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) तिचे पहिले प्रेम आणि नंतर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यासोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 2010 मध्ये लग्नबंधनात अडकलेले सानिया-शोएब हे स्पोर्ट्स जगतात पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. मात्र, काही काळापासून दोघांमध्ये काही चांगले चालले नाही.

माध्यामांतील वृत्तानुसार, दोघांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली आहे. शोएब मलिकसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, सानिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक दुःखद पोस्ट टाकली आहे. “तुटलेली ह्रदये कुठे जातात, अल्लाहसोबत स्वतःला शोधण्यासाठी.” त्याचवेळी, याआधीही तिने एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये तिने लिहिले होते की, “मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जाणारे क्षण.” फोटोमध्ये सानिया मिर्झा आणि तिचा मुलगा इझान दिसत आहेत.

सानिया आणि शोएब दोघेही वेगळे राहू लागले? :- सानिया आणि शोएब यांच्यातील मतभेदांमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु पाकिस्तानमधील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सूचित होते की, शोएब मलिकने त्याच्या एका टीव्ही शो दरम्यान सानियाची फसवणूक केली आहे. हे जोडपे आता वेगळे झाले असून काही काळापासून ते वेगळे राहत असल्याचा दावाही पाकिस्तानी मीडियाने केला आहे.

नुकताच मुलगा इझानचा वाढदिवस केला साजरा :- 2010 मध्ये सानिया मिर्झाने शोएब मलिकसोबत लग्न केले होते. त्यांना इझान हा चार वर्षांचा मुलगाही आहे. अलीकडेच दोघांनीही मुलगा इझानच्या वाढदिवसानिमित्त पार्टी केली आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शोएबची पहिली पत्नी सानिया नसून आयेशा सिद्दीकी आहे.

2010 मध्ये सानिया-शोएबच्या लग्नाआधी आयशा मीडियासमोर आली होती, ती शोएबची पत्नी असल्याचे सांगत होती. घटस्फोट दिल्याशिवाय शोएब लग्न करू शकत नाही. मूळची हैदराबादची राहणारी आयशा म्हणाली होती की शोएब तिच्या जाडपणामुळे तिला आवडत नाही. सुरुवातीला शोएब या लग्नाला नकार देत होता आणि घटस्फोट घेऊ नका असे सांगत होतामात्र वाद वाढल्यानंतर त्याने आयशाला घटस्फोट दिला. सानियासोबत लग्न झाल्यानंतर हा घटस्फोट देण्यात आला होता.

2010 मध्ये सानियाने केले होते लग्न :- सानिया मिर्झा 2010 मध्ये तिच्या खेळात अव्वल होती. शोएब मलिक देखील त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार होता. दोघांनी 2010 मध्ये लग्न केले. त्यावेळी सानियाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण तिने कधीही कोणत्याही खेळात पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. सानिया मिर्झाच्या आयुष्यात नवीन वादळाची एन्ट्री घोंघावू लागली आहेत.

पती शोएब सोबतच्या घटस्फोटावर आता सानियाने एक पोस्ट शेयर करुन आपल्या आयुष्यात काही चांगले चालू नसल्याचे म्हटले आहे. तिनं तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करत ज्यांची मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, यासगळ्यांच्या समस्यांवर अल्लाहच मदत करेल. असे सानियानं म्हटले आहे.

असे स्टेटस पोस्ट करताच सानियाला नेटकऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते सगळेजण देवालाच शोधायला निघाले आहेत. असे सानियानं म्हटले आहे. सानियाने केलेल्या या पोस्टमुळे सानिया आणि शोएब मलिकच्या वैवाहिक आयुष्यात चांगलं चाललं नसल्याचे नेटकरी म्हणू लागले आहेत. यावरुन सानियाला तिचे चाहते चांगलेच सुनावत आहे.

भारत पाकिस्तान या मुद्यांवरून सानियला लोक पुन्हा ट्रोल करू लागले आहे. लग्नाच्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्यातील अशा बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे तिनं शेयर केलेल्या पोस्टवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.