.
आता पर्यंत टीव्ही किंवा मेडियाद्वारे ज्यांना बघत आलोत अशा व्यक्तीला समक्ष बघून बेळगाव वासीयांना आनंदाचा सुखद धक्का बसला. क्रिकेटचा देव माणूस आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा साधेपणा बेळगावकरांना समक्ष बघायला भेटला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सन 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
परंतु असे असले तरी सचिनची क्रेझ मात्र जशीच्या तशीच आहे. सचिन तेंडुलकर हे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेलं नाव आहे. 90 च्या दशकात आणि त्यानंतर अनेक वर्ष सचिनने क्रिकेटचं मैदान गाजवलेलं. त्यावेळी सचिनने त्याच्या कारकिर्दीत विक्रमांचे अनेक इमले उभारलेले आहे की आजही लोकांना त्यांचा मोठा क्रेझ आहे.
सचिनचे काही विक्रम असे आहेत की अजून त्यांच्या जवळपासही कुणी जाऊन पोहचलेला नाही. परंतु असे असले तरी पंचतारांकित हॉटेल मध्ये जाण्याऐवजी सचिनने रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीला प्राधान्य देऊन आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा साधेपणा बेळगाव नगरीतील राहिवशांना बघायला मिळाला.
नेमकं घडलं काय :- सचिन तेंडुलरकर मुलगा अर्जुन, सेक्रेटरी आणि इतर सहकाऱ्यांसमवेत गोव्याला निघाले होते. मर्सिडीज आणि इन्होवा कार ने जात असताना त्यांनी बेळगाव येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या टपरीवजवळ येऊन आपल्या कार थांबवल्या आणि येथील चहाचा आस्वाद त्यांनी सर्वांनी घेतला. या चहाचे टपरीचे फौजी चहा असे नाव आहे.
त्यांनी सर्वांनी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. अचानक पणे आपल्या टपरीवर चहा घेण्यास आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनला बघून चहाच्या टपरीचे मालक पिंटू प्रकाश यांना या क्षणाचा नक्कीच सुखद धक्का बसला. या चहाचा आस्वाद घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर व इतर सहकारी यांचे यावेळी चहाचे बिल रक्कम रुपये 175 इतके झाले होते.
यावेळी त्यांनी 200 रुपयांची नोट देऊन त्या नोटेवर सचिनने सही करून हे बिल भरले. तसेच टपरी मालक यांचेकडून 25 रुपये परत न घेता त्याला टीप म्हणून वरची रक्कम तशीच राहू दिली. इतकेच नव्हे तर या नोटवर त्यांनी सही सुद्धा केली याचा आनंद टपरी यांना झाला. इतकेच नाही तर सचिन तेंडुलकर यांनी चहा टपरीचे मालक पिंटू प्रकाश सोबत एक सेल्फी देखील काढला.
यावेळी बेळगाव वासीयांना सचिन तेंडुलकर यांच्या साधेपणाचा अनुभव जवळून घेता आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन जवळपास 9 वर्ष होऊन गेली आहेत. पण तरी देखील त्याची जादू तसूभर देखील कमी झाली नाही. आज अनेक जन सचिनची एक झलक बघण्यास त्यास भेटण्यास खूपच उत्सुक असतात. परंतु कोणतेही प्रयत्न न करता बेळगाव येथील या तरुण टपरीचालकाला ही संधी स्वतःहोऊन चालत आली.