दुःखद ! रिंकू राजगुरू सोबत घडली धक्कादायक ‘घटना’ ! म्हणाली तो माझ्या ‘घरी’ आला आणि केली ‘या’ गोष्टीची मागणी…

बॉलिवूड

.

रातोरात स्टार बनणे फार कमी लोकांच्या नशिबी असते. रिंकू राजगुरू अशाच काही निवडक लोकांपैकी एक आहे. ही कल्पना करणे कठीण आहे की ज्या मुलीला शेजारी देखील अगदी कमी ओळखले जात होते, त्याच रिंकूला काही दिवसांनी असे काही घडले की तिला परीक्षेला बसण्यासाठी देखील सुरक्षा रक्षकांसोबत जावे लागले होते.

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी असलेल्या रिंकूचा चित्रपट किंवा सिनेसृष्टीच्या जगताशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता. एकदा मराठी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना काही कामानिमित्त सोलापूरला जावे लागले. नागराज मंजुळेसारख्या प्रसिद्ध व्यक्तीला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांमध्ये रिंकूही होती. नागराज सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी ग्रामीण भागातील मुलीच्या शोधात होते.

रिंकू राजगुरुला इंस्टाग्रामवर पाहून त्याला वाटले की ती त्याच्या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी योग्य आहे. घाईघाईत रिंकूचे ऑडिशन घेण्यात आले आणि ‘सैराट’ चित्रपटासाठी तिची निवड देखील झाली. ‘सैराट’ चित्रपटाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच यशाचा झेंडा रोवला नाही, तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला.

रिंकू राजगुरूची ओळख आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात झाली आहे. या चित्रपटाचा अनेक भाषांमध्ये रिमेक देखील झाला. बॉलिवूडमध्येही याच कथानकावर आधारित ‘धडक’ हा चित्रपट जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरला घेऊन तयार करण्यात आला होता. ‘सैराट’ नंतर रिंकू राजगुरूने आणखी एका मराठी चित्रपट ‘कागर’मध्ये काम केले. सैराटप्रमाणे हा चित्रपट यशस्वी ठरला नसला तरी चित्रपटातील रिंकू राजगुरूच्या कामाचे कौतुक झाले.

याशिवाय रिंकू राजगुरु लारा दत्तासोबत ‘हंड्रेड’ या हिंदी वेब सीरिजमध्येही दिसली होती. या वेब सीरिजसाठीही रिंकूची प्रशंसा झाली. 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ नंतर रिंकूमध्येही बरेच बदल झाले आहेत. सैराटच्या वेळी सोलापूरच्या एका छोट्या गावातून आलेली रिंकू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

पाश्चिमात्य आणि मॉडर्न ड्रेस परिधान केलेली रिंकू आता तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते. ज्यावेळेस सैराट हा चित्रपट आला त्यावेली रिंकू राजगुरु इतकी लहान होती की तीचे शिक्षण दहावी पर्यंत देखील झालेलं नव्हत. सैराट चित्रपट केल्यानंतर रिंकुच दहावीच शिक्षण पूर्ण झाले. आणि त्यानंतर रिंकूने तिचे बारावीचे देखील शिक्षण पूर्ण केले.

त्या दरम्यान अश्या अफवा ऐकू आल्या होत्या की रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. परंतु आकाश आणि रिंकू यांनी ही अफवा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. आता छोट्या पडद्यावर बस बाई बस हा कार्यक्रम सुरू आहे. बस बाई बस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांचेकडून केले जात आहेत.

बस बाई बस या शोमध्ये नावाजलेल्या अभिनेत्री आणि सेलिब्रिटीं यांनी हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही या शो मध्ये हजेरी लावण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही या शोमध्ये हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. तसेच राजकीय क्षेत्रातून सुप्रिया सुळे यांनी देखील या शो मध्ये हजेरी लावलेली आहे.

अशा इतर अनेक कलाकारांनी या शो मध्ये हजेरी लावलेली आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच या शोमध्ये रिंकू राजगुरू देखील हजेरी लावून गेलेली आहे. रिंकू राजगुरूने या शो मध्ये हजेरी लावल्यानंतर तीला सूत्रसंचालक अभिनेते सुबोध भावे यांनी भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले. त्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा विचारला होता की तुला एखादा भयानक अनुभव आला का?

असा प्रश्न त्यांनी रिंकुला विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर हो म्हणून देत रिंकूने सांगितले की एक वेळेस मी एका ठिकाणी कार्यक्रमात पोहचली होते आणि त्यावेळी मी एका चाहत्याकडे पाहून त्याला हात दाखवला होता. तेव्हा असे काही भयंकर घडले की हा चाहता चक्क माझ्या घरी पोहचला आणि त्याने माझ्या आई-वडिलाकडे थेट माझ्या लग्नाचीच मागणी घातली.

तो चाहता जेव्हा माझ्या घरी पोहचला होता त्यावेळेस मी बाहेर गेलेली होते. मी बाहेरून घरी पोहचल्या नंतर माझ्या आई वडिलांनी मला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तो चाहता त्यावरच थांबला नाही तर तो पुन्हा दुसऱ्या दिवशीही माझ्या घरी पोहचला. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी येताने त्या चाहत्याने चक्क नोटांची एक बॅग भरून आणली होती.

आणि दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्याने माझ्याकडे लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा आम्ही कसेबसे त्या चाहत्याला घराबाहेर काढून दिले. रिंकूने सांगितलेली ही घटना खूपच भयंकर व दुःखद अशी होती. रिंकुला आलेला हा अनुभव आणि घटना ऐकून अनेक जण चकित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.