इतक्या दिवसांनी रविना टंडनने केला दर्दभरी क्षणाचा खुलासा, म्हणाली अंगात ताप आणि पिरिएड्सही चालू होते तरी देखील अक्षयने माझ्या…

बॉलिवूड

नमस्कार !

बॉलीवूडची मस्त मस्त गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. रवीनाने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आणि आजही लोक तीच्या अभिनयावर फिदा आहेत. एक काळ असा होता जेव्हा रवीना टंडनचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट होते.

मात्र, आजही तिचा तोच जलवा जसेचा तसा शाबूत आहे. त्याचवेळी ‘मोहरा’ हा चित्रपट तीच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला होता. आणि अभिनेत्री रवीना टंडनचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटातील दोघांची जोडी चांगलीच गाजली होती. याशिवाय याच चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पाणी’ हे गाणे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले.

आजही त्याची लोकप्रियता लोकांमध्ये पाहायला मिळते. हे गाणे चित्रित करण्यासाठी खूप मेहनत करावी लागल्याचे बोलले जाते. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री रवीना टंडनला खूप ताप आला होता. पण तरीही गाण्याचे शूटिंग पूर्ण झाले आणि रवीना टंडनने तापाच्या फिव्हरमध्ये हे गाणे शूट केले.

याचा खुलासा अभिनेत्री रवीना टंडनने नुकताच केला आहे. एका मुलाखतीदरम्यान रवीना टंडनने या गाण्याची कहाणी सांगताना सांगितले की, “टिप टिप बरसा पानी” या गाण्याचे शूटिंग एका अंडरकन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये झाले आहे. शूटिंगदरम्यान माझ्या पायाला खडे टोचत होते. इतकंच नाही तर शूटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या टाकीतील पाणी खूप थंड होतं.

त्या पाण्यात पुन्हा पुन्हा भिजल्यामुळे मला सर्दी आणि ताप आला होता. संपूर्ण अंग तापाने फनफनत होते. प्रचंड थंडीमुळे मला खूप ताप आला होता आणि माझे शरीर तापाच्या आगीने जळत होते. सर्दी कमी करण्यासाठी मी सेटवर वारंवार मध आणि आल्याचा चहा प्यायची. शूटिंगदरम्यान गुडघ्यावर गोल गोल फिरताना माझा पायाला ओरखडा ओढला गेला होता.

त्यातच माझी मासिक पाळी देखील नेमकी त्याच वेळी चालू होती. कोणत्याही परिस्तिथीत गाण्याचे शूटिंग पूर्ण करायचे असल्याने सर्व काही निमूटपणे सहन करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. इतकं सगळं घडून देखील ओल्या चिंब पावसाच्या दृश्यात अक्षय देखील थांबण्यास तयार नव्हता.

या गाण्यात मला खूपच कामुक दाखवले गेले होते. अशा परिस्तिथीत हे सगळं करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं.” या चित्रपटात काम केल्यानंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यानंतर काही कारणावरून त्यांच्यात भांडण झाले.

त्यामुळे त्यांचे नातेही तुटले. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि आजही लोकांना या जोडीला एकत्र पाहायला आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published.