.
रश्मिका मंदानाचं 2 मुलांच्या बापावर जडलाय जीव. या अभिनेत्यासोबत सात फेरे घेण्याची होतेय इच्छा. नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली दक्षिणेंतील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना. तिचे नाव अनेकदा तिच्या ‘गीता गोविंदम’ या चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या नावासोबत घेतले जाते. रश्मिकाचे स्मितहास्य आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून लोक तिच्याकडे चटकन आकर्षित होतात.
पण रश्मिकाचा क्रश कोण आहे आणि ती कोणाला तिच्या स्वप्नांचा हिरो मानते हे तुम्हाला माहीत आहे का? रश्मिकाचे क’रोडो चाहते असले तरी, रश्मिकाचे स्वतः तमिळ चित्रपट सुपरस्टार विजय जोसेफ म्हणजेच थलपथी विजयसोबत काम करण्याचे स्वप्न आहे. मात्र, विजय विवाहित असून दोन मुलांचा बाप आहे. ‘मास्टर’ विजय (थलपथी विजय) चित्रपटाचा नायक रश्मिका मंदानाचा क्रश आहे.
ज्याच्यासोबत तिला तिच्या भावी स्वप्नातील भूमिका करायची आहे. तसे, रश्मिकाने हे विधान एक नव्हे तर अनेक प्रसंगी केले आहे. ‘भीष्म’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रश्मिका मंदानानेही हावभावांमध्ये हे सांगितले होते. याशिवाय एका मुलाखतीत रश्मिकाने सांगितले होते की, तमिळ संस्कृतीचा तिच्यावर खूप प्रभाव पडतो आणि तिला फक्त तमिळ मुलाशीच लग्न करायचे आहे.
रश्मिकाच्या म्हणण्यानुसार, मी तामिळनाडूच्या संस्कृतीचा आणि विशेषतः त्यांच्या खाद्यपदार्थाने खूप प्रभावित आहे. मला तमिळ खाद्यपदार्थ आवडतात आणि ते खूप स्वादिष्ट आहे. आशा आहे की मी एका तमिळी मूलाशी लग्न करेन आणि तामिळनाडूची सून होईल. जोसेफ विजय देखील एक तमिळ आहे, परंतु समस्या अशी आहे की तो आधीच विवाहित आहे आणि 2 मुलांचा पिता आहे.
रश्मिका मंदान्ना ही नॅशनल क्रश आहे :- रश्मिका मंदान्नाला बॉलिवूडमधूनही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत. रश्मिका मंदाना हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. रश्मिका मंदान्ना सध्या एका चित्रपटासाठी २ को’टी रु’पये मानधन घेते. टॉलिवूड (तेलुगु फिल्म इंडस्ट्री) मध्ये 100 को’टीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारी रश्मिका ही अभिनेत्री बनली.
ती लवकरच मिशन मजनू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. रश्मिका मंदान्ना हिने तिचे शालेय शिक्षण कूर्ग पब्लिक स्कूल, कोडागु येथून केले. पुढील शिक्षणासाठी तीने म्हैसूर इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड सायन्समधून शिक्षण घेतले. रश्मिका मंदान्ना तिच्या क्यूट स्माईल आणि लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
रश्मिका मंदान्नाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 4 वर्षात जवळपास 10 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये किरिक पार्टी, अंजनी पुत्र, चमक, चलो, गीता गोविंदम, देवदास, यजमान, डियर कॉम्रेड, सरिलेरू नेक्केवरू आणि भीष्म, पोगारू आणि सुलतान या चित्रपटांचा समावेश आहे.
रश्मिका लवकरच मिशन मजनूमध्ये दिसणार आहे. 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकातील विराजपेट येथे जन्मलेल्या रश्मिकाचे आउटफिट्स तर चर्चेत आहेतच पण तिचा गोंडस चेहरा, सौंदर्य आणि स्टाईलनेही लोक प्रभावित झाले आहेत.