.
आजच्या बॉलिवूड चित्रपटांत आणि पूर्वीच्या चित्रपटांत किती फरक आहे हे सांगायची गरजच नाही. केवळ चित्रपटांतच फरक झाला नाही तर कलाकार देखील प्रचंड बदलले आहेत. सध्या चित्रपटांच्या मागणीनुसार सहज कलाकार कोणतीही भूमिका साकारायला एका पायावर तयार असतात. परंतु पूर्वी अस नव्हत, मागणीनुसार कलाकार वेगवेगळे सीन्स साकारायला डगमगत होते.
पूर्वी दिग्दर्शकांना कलाकारांना मनवावे लागत असे. पूर्वी चित्रपटांमध्ये एखादा मगणीनुसार इं’टीमेट सीन करायचा म्हटलं की, निर्माते दिग्दर्शक कलाकारांना मनवून तयार करायचे. जरी कलाकारांनी ते सीन्स केले चित्रपट प्रदर्शित झाला तरी प्रेक्षकांना मात्र ते मान्य नसायचं. तसेच मनाविरुद्ध कलाकारांना काही गोष्टी कराव्या लागत होत्या. अशीच एक कथा आहे दिग्दर्शक अनिल गांगुली यांच्या राजेश खन्ना स्टारर ‘आंचल’ या चित्रपटाची.
1980 च्या या चित्रपटात राजेश खन्ना व्यतिरिक्त रेखा, अमोल पालेकर, प्रेम चोप्रा आणि राखी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात अमोल पालेकर आणि राजेश खन्ना यांच्यापेक्षा लहान राखी त्यांचे मेव्हणे बनले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अशी घटना घडली की, राजेश खन्ना यांची सहकलाकार अमोल पालेकर सोबतची मैत्री कायमची तुटली.
प्रत्यक्षात अमोल पालेकर यांनी हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला होता. दिग्दर्शकांनी त्यांची खूप समजूत काढली पण तो तयार झाला नाही. यानंतर राजेश खन्ना आणि दिग्दर्शक अनिल गांगुली यांनी त्यांना एका युक्तीने हा सीन करायला लावला. मात्र, सीन पूर्ण झाल्यानंतर अमोल पालेकर आणि राजेश खन्ना यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.
राजेश खन्ना यांना अमोल पालेकरला लाथ मारावी लागली :-
अमोल पालेकर यांना आपली चूक मान्य करून राजेश खन्ना यांची माफी मागावी, असा सीन होता. अमोलला राजेश खन्नाचे पाय धरून माफी मागावी आणि त्याचवेळी राजेश खन्नाने अमोल यांना लाथ मारावी असा सीन शूट करायचा होता. अमोलने हा सीन करायला नकार दिला होता. अमोल कोणत्याही प्रकारे तयार नसताना राजेश खन्ना आणि अनिल गांगुली यांनी एक प्लॅन बनवला.
अनिल गांगुलीने अमोल पालेकर यांना गुडघ्यावर बसून राजेश खन्ना यांची माफी मागण्यास प्रवृत्त केले होते. खूप मनवल्यानंतर अमोलने हा सीन करायला होकार दिला होता. पण हा सीन शूट होत असताना अमोल गुडघ्यावर बसून राजेश खन्ना यांची माफी मागत होता. तेव्हा दिग्दर्शकाने राजेश खन्ना यांना अमोल पालेकरला लाथ मारून खाली पाडण्याचा इशारा दिला. राजेश खन्ना यांनीही तेच केले. यानंतर अमोल पालेकर आश्चर्यचकित झाले. त्याने नकार देऊनही हा सीन चित्रपटात करण्यात आला.
अमोल पालेकर जमिनीवर पडल्यावर राजेश खन्ना आणि अनिल गांगुली दोघेही हसायला लागले, पण अमोल पालेकर गप्प राहिले. त्यानंतर त्यांनी राजेश खन्ना आणि दिग्दर्शक अनिल गांगुली यांच्यासोबत कधीही काम केले नाही. राजेश खन्ना हे अमोलपेक्षा ज्येष्ठ होते. ते राजेश खन्ना यांना आपला चांगला मित्र मानत. पण या चित्रपटानंतर त्यांची मैत्री कायमची तुटली.