मीरा कपूरने उलगडले शाहिद आणि तीच्या नात्यातील ‘रंजक’ रहस्य, म्हणाली जेव्हा मी १६ वर्षांची होते, तेव्हा आम्ही पहिल्यांदा…

बॉलिवूड

.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय आणि आवडते जोडपे आहेत. हे दोघे गोव्यात त्यांच्या अत्यंत आवश्यक सुट्टीचा आनंद घेत आहेत. मीरा तिच्या ट्रिपचे अनेक फोटो शेअर करत असते. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरं तर मीरा फिल्मी दुनियेशी संबंधित नाही, पण तरीही शाहिद आणि मीराची केमिस्ट्री अफलातून आहे.

अशा परिस्थितीत हे दोघे पहिल्यांदा कुठे आणि कधी भेटले हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मीराच्या एका इंस्टाग्रामवरील संवादात्मक सत्रात एका चाहत्याने तिला शाहिदसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल विचारले. जिथे तीने त्यांच्या भेटीबद्दल अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या.

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिची शाहिद कपूरशी भेट झाली :- मीराने एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितले होते की, मी त्याला पहिल्यांदा भेटले होते जेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. त्या काळात मीरा तिच्या आई-वडिलांसोबत कॉमन फॅमिली फ्रेंडच्या घरी गेली होती. जिथे सुफी संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दोघांनी पहिल्यांदाच एकमेकांना पाहिलं होतं.

शाहिद आणि मीराच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत :- महत्त्वाचं म्हणजे शाहिद आणि मीराचं लग्न 7 जुलै 2015 रोजी झालं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना मुलगी मिशा आणि मुलगा जैन या दोन मुलांचे पालक आहेत. मीरा अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलांचे फोटो शेअर करत असते.

मीराने यापूर्वी तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आता तिला शाहिदचे काम आणि त्याची जीवनशैली समजली आहे आणि आता ती त्यासाठी तयार आहे. ते म्हणाली की,येथे जीवन जगण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत सर्व काही माझ्यासाठी नवीन होते जे मी आता शिकली आहे.

तीने सांगितले की, लग्नानंतर तीने पहिल्यांदा फाटलेली जीन्स घातली होती. तिने पुढे सांगितले की, शाहिदचा जीवनातील साधेपणा हा तिला आवडणारा आणखी एक गुण आहे. शाहिदच्या या गुणामुळेच ती या नव्या वातावरणात सहज जुळवून घेऊ शकली, असे तिचे मत आहे. आम्ही एकमेकांचे संभ्रम दूर करण्यासाठी कठोर परिश्रम देखील करतो जेणेकरून आम्हा दोघांचे जीवन सोपे होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.