.
प्रेमाला कोणत्याही वयाची अट नसते. प्रेमातील ताकत ही जगातील सर्वात मोठी ताकत असते. कोणीही प्रेमात पडत असताना त्यांच्यातील वयाचा किंवा गरीब श्रीमंतीचा विचार करत नसतो. म्हणतात की प्रेम आंधळे असते. अगदी नातेसबंधही प्रेमपुढे फिक्का पडतो. प्रेमात इतकी ताकत असते की ते कधी कधी नातेसंबंधालाही जुमानत नाही.
अशाच प्रकारची एक घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडली आहे. विवाहित तरुण मामीचा तिच्याच नात्यातील भाच्यावर जीव जडला आणि यामुळे त्यांच्यातील नात्यावर याचा मोठा परिणाम झाला. वयाने भाचा लहान होता. त्याचे त्याच्या मामाकडे नियमित येणे जाणे सुरू होते. त्याचवेळी 35 वर्ष्याच्या तरुण मामीचा भाच्यावर जीव जडला.
परंतु याची खबर मामला जेव्हा समजली तेव्हा खूप वेळ होऊन गेला होता. मामाला हा प्रकार खूपच उशिरा समजला. वेळ हातातून निघून गेली होती. शेवटी मामी-भाच्याचे हे प्रेमप्रकरण पोलीस ठाण्या पर्यंत पोहचले. बीनासर येथील हे प्रेमप्रकरण असून अखेर मामाने पोलिस स्टेशन ला जाऊन त्याच्याच पत्नीच्या आणि भाच्याच्या विरोधात रीतसर तक्रार दिली.
मामाने तक्रारीत असे लिहिले आहे की नेशल येथील एका महिलेसोबत त्याचे सुमारे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला त्याच्या या पत्नीपासून दोन अपत्य देखील झालेले आहे. तसेच मामला एक बहीण देखील आहेत आणि ती तिच्या सासरी कारंगोला येथे सासरी राहते. त्याच्या बहिणीला एक मुलगा देखील आहेत आणि अजून तो अल्पवयीन आहे.
तो मुलाचे नियमितपणे मामाच्या घरी येणे जाणे होत होते. यादरम्यान भाचा आणि मामी यांच्यादरम्यान एकमेकांमध्ये प्रेमसंबंध जडले आणि अखेर त्यांनी जीवनभरासाठी एकत्र राहण्याचे ठरविले. त्यानंतर मामीने तिच्या पतीला म्हणजेच मामाला सांगितले की मी भाच्यासोबत राहावयास जाणार असून आम्ही दोघांनीही लग्न केले आहे. हे ऐकून मामाला धक्काच बसला. ऐकून मामाच्या डोळ्यासमोर चटकन अंधारी आली.
पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारी मध्ये मामाने असेही लिहून दिले आहे की मी अजून तरी माझ्या पत्नीला कायदेशीर रित्या घटस्फोट दिला नाही आणि त्यामुळे या दोघांनी केलेलं लग्न बेकायदेशीर आहे. हे प्रेमप्रकरण घरातीलच व नात्यातील असल्याने नातेवाईकांनी दोघां मामी भाच्याला खूपदा समजविण्याचा प्रयत्न केला व विभक्त होण्यास सुचविले.
दोघेही लग्न करून एकत्र न राहण्यावची कुटुंबीयांनी दोघांनाही सुचीत केले. पण तरीदेखील त्यांच्यातील प्रेमाची पक्कड इतकी घट्ट होती की दोघांनीही एकत्र राहून संसार करण्याच्या निर्णयावर दोघेही अडून राहिले. मामीने स्वतःच स्पष्ट पणे सांगितले की आम्ही दोघेही एकत्रच राहणार आणि एकत्रच मारणार. मामीने मामासोबत राहण्यास सर्वांसमोर जाहीरपणे नकार दिला.
मामीचे वय ३५ वर्षे असून भाच्याचे वय १७ वर्षे इतके आहे. असे जरी असले तरी पण दोघांच्या मध्ये नातेसंबंध तर आहेच पण दोघांचेही हे लग्न बेकायदेशीर आहेत. प्रेमप्रकरणाचा हा आगळा वेगळा प्रकार बघून कुटुंबीय हतबल झाले असून पोलीसही गोंधळात पडले आहे. ही प्रेमप्रकरनाची पहिलीच घटना नसून यासारख्याच अनेक घटना आपण यापूर्वीही बघितलेल्या आहेत.