.
भोजपुरीमध्ये अभिनेत्री आम्रपाली दुबे हिला यूट्यूबची क्वीन म्हणून ओळखले जाते. सुपरहीट अभिनेत्री आम्रपाली दुबेची गणना इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये केली जाते. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक भोजपुरी सुपरहीट चित्रपट केले आहेत. इतकचं नाही, तर तिने जवळपास प्रत्येक सुपरस्टारसोबत स्क्रीन देखील शेअर केली आहे.
अभिनयासोबतच आम्रपाली सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. आम्रपाली दुबेने अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. भोजपुरी क्वीन इंडस्ट्रीतील सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच आम्रपालीच्या चाहत्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.
आता आम्रपाली दुबे हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती 10वी नापास व्यक्तीशी लग्न करते आणि नंतर गोंधळ निर्माण होतो. एकीकडे ती सिंदूर लावते तर दुसरीकडे तिला पतीसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत.
अभिनेत्री ग्रॅज्युएट टॉपर आहे, मग तिची काय मजबुरी होती की तिने दहावी नापास मुलाशी लग्न केले.
लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता अरविंद अकेला कल्लू आणि यूट्यूब क्वीन आम्रपाली दुबे यांचा ‘शादी मुबारक’ हा भोजपुरी चित्रपट लवकरच चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. याआधी, या चित्रपटाचा ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अकेला कल्लू 10वी अनुत्तीर्ण व्यक्तीची भूमिका साकारत आहे आणि आम्रपाली दुबे पदवीधर जिल्हा टॉपरची भूमिका साकारत आहे.
आता अशा परिस्थितीत जेव्हा कल्लूच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगी शोधली तेव्हा त्याला सर्वत्र नकार मिळतो. कारण तो कमी शिकलेले असतो. त्याचवेळी आम्रपाली दुबे आणि त्याच्या कुटुंबियांची भेट होते. दोघांच्या लग्नाची चर्चा रंगते आणि ते लग्न करतात. आता गदारोळ सुरू होतो, कल्लू दहावी नापास झाल्याचे अभिनेत्रीला कळते. यावर ती नाते तोडते पण सिंदूरही लावते.
तुम्हाला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून, तो अश्लीलतेपासून दूर आहे. मात्र, या ट्रेलरमध्ये हे स्पष्ट झालेले नाही की, ते लग्न कसे करतात आणि शिक्षित झाल्यानंतर लग्न करण्यास ते कसे राजी होतात?
हे सर्व पाहण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागेल. ट्रेलर वरून समजते की, चित्रपट किती खास असणार आहे. ‘शादी मुबारक’ चित्रपटाचे निर्माते रोशन सिंग असून दिग्दर्शक आनंद सिंग आहेत, त्यांनी आजच्या युगात शिक्षणाचे महत्त्व दाखवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
यात अरविंद अकेला कल्लू, आम्रपाली दुबे तसेच अभिनेते समर्थ चतुर्वेदी, विनोद मिश्रा, सृष्टी पाठक आणि सौम्या पांडे सारखे उत्कृष्ट कलाकार आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट गाणी प्यारे लाल यादव, अरबिंद तिवारी, श्याम देहाती, आझाद सिंग, यादव राज, आशुतोष तिवारी आणि शेखर मधुर यांनी लिहिली आहेत. कानू मुखर्जी, प्रसून यादव हे नृत्यदिग्दर्शक आहेत.