सुंदर दिसण्याच्या नादात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला स्वतःचा जीव, राखी सावंतने डोळ्यातून ‘अश्रू’ ढाळून सांगितली संपूर्ण घटना…

बॉलिवूड

.

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सर्वत्र आपला ठसा उमटवणाऱ्या राखी सावंतची लोकप्रियता खूप जास्त आहे. तीचा अभिनय चाहत्यांना खूप आवडतो. राखी ही सर्वात मजेदार अभिनेत्रींपैकी एक आहे. चाहत्यांनी राखीला अधूनमधून रागावताना पाहिलं असेल.

नेहमी हसणाऱ्या राखीने नुकतेच एक वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये ती थोडी रागावलेलीही दिसत आहे. तीच्या या वक्तव्याचे चाहते मोठ्या प्रमाणात समर्थन करत आहेत. ज्यामध्ये राखी सावंत अभिनेत्री चेतना राजबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. जो यावेळी चर्चेचा विषय बनला आहे.

चेतना राज या कन्नड अभिनेत्री होत्या. होय, यापूर्वी चेतना राजने सर्वांचा निरोप घेतला होता. आपल्या चाहत्यांना सोडून तिने हे जग कायमचे सोडले. चेतना राजने तिच्या चित्रपटातून लाखो लोकांच्या मनावर राज्य केले. इतक्या लहान वयात हे जग सोडल्यानंतर चाहत्यांना तीची खूप आठवण येत आहे.

चेतना राज यांनी वयाच्या २१ व्या वर्षी हे जग सोडले होते. पण या काळात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी हे जग सोडून जाण्याचे कारण काय. कन्नड अभिनेत्री चेतना राजने हे जग सोडण्यामागे प्लास्टिक सर्जरी हे कारण सांगितले जात आहे. खरे तर चेतनाचे वजन थोडे वाढले होते.

त्यानंतर ते कमी करण्यासाठी तीने प्लास्टिक सर्जरीचा मार्ग निवडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही सूचना तीने डॉक्टरांनी दिली होती. ज्यावर आता राखी सावंतने वैद्यकीय यंत्रणेकडे बोट दाखवत भूक कमी करण्यासाठी डॉक्टर पोटही कापतात असे म्हटले आहे. आधी काही लोक या बड्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करतात, मग स्वतःचा दवाखाना उघडून बसतात.

राखीने सांगितले की, जर चेतना राजने प्लास्टिक सर्जरीचा मार्ग निवडण्याऐवजी वर्कआऊटद्वारे वजन कमी करणे योग्य मानले असते तर आज ती जिवंत असती. एकदा राखी सावंतने तिच्या नाकाची प्लास्टिक सर्जरी केल्याची बातमी आली होती. पण तीला फारसा त्रास झाला नाही. अलीकडे, अभिनेत्री तिच्या वयापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. दोघेही अनेकदा कुठेतरी एकत्र स्पॉट झाले आहेत. जिथून त्यांचे अनेक फोटोही व्हायरल होतात.

Leave a Reply

Your email address will not be published.