.
बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करीना कपूर खानने एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. जे चाहत्यांना खूप आवडले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बेबोची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. ही अभिनेत्री अनेकदा चर्चेत असते. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर महामारीच्या विळख्यात होती. त्यामुळे तीला तिच्या घरात क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते.
क्वारंटाईनमुळे तिला पती सैफ अली खान आणि मुलांपासून दूर राहावे लागले होते. पण तुम्हाला माहित आहे का की करीनाला एकदा तिच्या माहेरच्यांनी सैफसोबत लग्न करण्यास मनाई केली होती. सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम जोडींपैकी एक आहे. दोघांची ही जोडी चाहत्यांना खूप आवडते.
ही जोडी अनेकदा चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या एका खुलाशामुळे चर्चेत आहे. तिच्या खुलाशात अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने सैफसोबत लग्नाची बाब तिच्या कुटुंबियांसमोर आणि जवळच्या मित्रांसमोर ठेवली तेव्हा सर्वांनी करीनाला सैफसोबत लग्न करण्यास नकार दिला होता.
करिनाच्या जवळच्या मैत्रिणींनी तिला सांगितले होते की, सैफशी अजिबात लग्न करू नकोस, नाहीतर तिचं करिअर बरबाद होईल. त्याचवेळी लोकांनी तिला असेही सांगितले की सैफ 2 मुलांचा बाप आहे आणि तो तुझ्यापेक्षा वयस्कर आहे. त्यामुळे करिनाने त्याच्याशी लग्न करू नये असेच सर्वांचे मत होते.
लोकांच्या असे म्हणण्यावर करिनाने विचार केला की प्रेम करणे वाईट आहे का आणि असे असले तरी मी सैफशीच लग्न करेन. सैफसोबत लग्न केल्यानंतर काय होईल हे पाहायचे असल्याचे तिने सांगितले. यावेळी करीना आणि सैफ त्यांच्या प्रेमाने भरलेल्या जगात खूप आनंदी आहेत. दोघांना दोन मुलेही आहेत.
ज्यांची नावे त्यांनी तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी ठेवली आहेत. अभिनेता सैफ अली खानबद्दल बोलायचे झाले तर त्याची लव्ह लाईफ सुरुवातीपासूनच चर्चेत होती. सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची भेट एका शूटिंगदरम्यान झाली होती. तेव्हा अमृता नावाजलेली अभिनेत्री बनली होती.
पण सैफने चित्रपटात पाऊलही ठेवले नव्हते. त्याच वेळी, दोघेही पहिल्या नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1991 मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2008 मध्ये सैफ करीना कपूरला भेटला.
‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2012 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. त्याचबरोबर दोघांची ही जोडी लोकांना खूप आवडली आहे. दोघांनाही अनेकदा बाहेर त्यांच्या मुलांसोबत पाहिले जाते.