इं’टिमेंट सीन देतेवेळी 42 वर्षीय रेखाचा सुटला होता स्वतःवरील ‘ताबा’, पहा 13 वर्षाने लहान अभिनेत्याच्या पाठीतच खुपसवले होते ‘नखे’…

बॉलिवूड

.

बॉलिवूड विश्वाची सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नाव कमावले आहे. 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या रेखा म्हणजेच भानुरेखा गणेशन यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘रंगुला रतलाम’ या तेलगू सिनेमातून केली. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट अंजना सफर 1969 मध्ये आला होता.

पण अभिनेता बिश्वजितसोबतच्या तिच्या किसींग सीनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात रेखा अवघ्या 15 वर्षांच्या होत्या. एका रोमँटिक गाण्याच्या शूटिंगदरम्यान, चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन बोलताच विश्वजितने रेखा यांच्या ओठांवर किस करण्यास सुरुवात केली आणि ही किस 5 मिनिटे सुरू राहिली.

अल्पवयीन रेखा यांना या सीनबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्या तिथेच रडायला लागल्या. अशा प्रकारचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. नंतर अभिनेत्याने सांगितले की, दिग्दर्शकाला रेखा यांचा संपूर्ण चेहरा घ्यायचा होता. परंतु, या सीनमुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही आणि त्यामुळे रेखा यांचा पहिला हिंदी चित्रपट सिनेमागृहात पोहोचू शकला नाही.

10 वर्षांनंतर हा चित्रपट दुसऱ्या नावाने (दो शिकारी) प्रदर्शित झाला. नंतरच्या काळात याच अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये असे बो’ल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले, जे पाहून सगळेच थक्क झाले होते. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडी का खिलाडी’ या चित्रपटात रेखाने आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान अभिनेता अक्षय कुमारसोबत अनेक लव सीन्स दिले होते.

यादरम्यान, बेडरूम आणि पूलच्या इंटिमेट सीन दरम्यान रेखा यांनी त्यांचा संयम गमावला आणि अक्षय कुमारच्या पाठीवर नखे ओरखडली, ज्यामुळे अक्षय जखमी झाला. त्यावेळी रेखा 42 वर्षांची होत्या, तर अक्षय 29 वर्षांचा होता. चित्रपटातील दोघांचे असे बो’ल्ड सीन्स पाहून सर्वांनी तोंडातच बोटे घातली.

रेखा यांनी या चित्रपटात पहिल्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आणि तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. अक्षय कुमार आणि रेखा यांच्याशिवाय या चित्रपटात रवीना टंडनचीही भूमिका होती. हा चित्रपट आज देखील प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.

Leave a Reply

Your email address will not be published.