.
खेळ कोणताही असो जर तो मोकळ्या मैदानात खेळला जात असेल तर खेळाची मज्जाच वेगळी असते. त्यात खेळ जर क्रिकेट चा असेल तर मग विचारूच नका. खेळ आला म्हणजे प्रत्येक खेळात नियम कोणताही असो त्याचे काही नियम येतातच. नियमांशीवाय खेळाची प्रतिष्ठा देखील वाढत नाही.
आणि खेळातील नियम जितके मैदानातील खेळाडू वर लादलेले असतात तितकेच ते नियम मैदाना बाहेरील प्रेक्षकांवर देखील काही नियम असतात. असाच ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या एका सामन्यात एक महिलेने असा काही प्रकार केला की तिचा तो व्हिडीओ बघून संपूर्ण जगात चर्चा सुरू झाली.
भारतातील क्रिकेटच्या सामन्यात प्रेक्षक अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रवेश करतात आणि त्यांची इच्छा असते की आवडत्या क्रिकेटपट्टू सोबत फोटो काढायचा तसेच त्यांचा हातात हात घेऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करायचा. असेच खेळाडूंचे चाहते जगभर बघायला मिळतात. परंतु आज आपण ज्या विषयावर बोलत आहोत ती घटना ऑस्ट्रेलियात घडली. घडलेला हा प्रकार जरा धक्कादायकच होता.
रग्बी लाइव सामन्यात एक प्रेक्षक महिला अचानक टॉपलेस झाली आणि तीने मैदानात प्रवेश केला. या अनपेक्षित प्रकारामुळे तो सामना काही वेळासाठी थांबवावा लागला होता. त्यावेळी Gold Coast Titans व Parramatta Eels या दोन संगांमध्ये मॅच सुरू होती. त्यावेळी तेथे प्रेक्षकही काही कमी नव्हते. अचानकच प्रेक्षकांमधील एक महिलेने अचानक मैदानात प्रवेश केल्याचे तिथे उपस्तीत आयोजकांचे लक्षात आले.
महिलेने असा अचानक मैदानात प्रवेश केल्याचे बघून इतर प्रेक्षक देखील थक्क झाले. प्रेक्षकांना धक्का तर तेव्हा बसला जेव्हा हे लक्षात आले की तिने टॉपलेस होऊन मैदानामध्ये प्रवेश केला होता. या महिलेचे नाव जावोन जोहानसन असल्याचे समजते. या महिलेने अचानक मैदानात प्रवेश केल्याचे लक्षात येताच तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेचच त्या महिलेला पकडले आणि पकडून तिला मैदानाबाहेर घेऊन गेले.
हा सर्व प्रकार बघून मात्र सोशल मीडियात मोठा वाद सुरू झाला आहे. याचे कारण असे की तेथे आलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ज्या पद्धतीने मैदानाच्या बाहेर ओढत नेले ती पद्धत अत्यंत चुकीची पद्धत असल्याचे काहीं लोकांनी म्हटले आहे. या उटल काहीं लोकांना जावोनने केलेला हा प्रकार अजिबात आवडलेला दिसत नाहीये. त्यांनी त्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
आता सर्वांना हाच प्रश्न सतावत असेल की ही महिला प्रेक्षक का टॉपलेस झाली असेल. अशा प्रकारची मैदानात टॉपलेस आणि नग्न होऊन प्रेक्षकाने प्रवेश केल्याची ही काही पहिली वेळ नाहीये. खूपदा एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी असले प्रकार केले गेले आहेत. परंतु जावोन जोहानसन टॉपलेस होण्यामागचे कारण काहीसे वेगळेच होते.
A pitch invader who interrupted the @GCTitans game on Saturday night has been charged. Javon Johanson went viral after running shirtless onto the field. https://t.co/I1zrMcKW10 @georgiacosti #NRL #7NEWS pic.twitter.com/XwJ5XcREFO
— 7NEWS Gold Coast (@7NewsGoldCoast) April 11, 2022
ती लाईव मॅच दरम्यान टॉपलेस होऊन मैदानात घुसली कारण तिच्या मैत्रिणींनी त्या महिलेला तसे चॅलेंज दिले होते. मैत्रिणींनी दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठी या महिलेने हा सर्व प्रकार केला गेल्याचे बोलले जातेय. ती महिला म्हणाली की यात चर्चा करण्यासारखे काही नाहीये. माझ्या मैत्रिणींनी मला चॅलेंज दिले होते जे मला पूर्ण करायचे होते आणि मी देखील ते पूर्ण करून दाखवले. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नाही. मैदानात टॉपलेस होऊन येण्यापूर्वी या महिलेने एक व्हिडिओ पण शूट केल्याचे बोलले जात आहे.