सबसे कातिल गौतमी पाटील! एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते माहितीये? पहा एका डान्स साठी इतके ‘मानधन’ घेते गौतमी पाटील..

बॉलिवूड

.

ग्रामीण भागात गौतमी पाटीलची लोकप्रियता खूपच जास्त आहे. सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी येथे तर एका पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या वडिलांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी आजुबाजूच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला महिला प्रेक्षकांची संख्याही लक्षणीय होती.

लहानांपासून तरूण आणि म्हाताऱ्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते माहितीये का?

आपल्या डान्सनं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अन् खेड्यापाड्यात क्रेझ आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं गौतमी पाटील हे नावं चर्चेत आलं.

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आणि त्यानंतर गौतमी पाटील हे नाव कायमच चर्चेत राहिलं. गौतमीवर झालेल्या आरोपानंतर तिनं तिच्या डान्समध्ये आणि स्वत:मध्ये बरेच बदल केले. तिच्यावर कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र दिवसेंदिवस गौतमीची क्रेझ वाढतच असल्याचं चित्र दिसतंय.

नेत्याच्या कार्यक्रमांपासून ते चिमुरड्यांच्या बर्थ डे पार्ट्यांसाठी गौतमीला आमंत्रणं येऊ लागली आहे. गौतमीच्या एका महिन्यातील सगळ्या तारख्या फुल्ल होऊ लागल्या आहेत. कार्यक्रमांच्या घेऊ तितक्या सुपाऱ्या कमी आहे, अशी अवस्था गौतमीची झाली आहे.

इतकी टीका होऊन, आरोप होऊनही त्याच दमात कार्यक्रम करणारी गौतमी एका सुपारीचे ( कार्यक्रमाचे) किती पैसे घेत असेल याचा विचार तुम्ही कधी केलाय का? न्यूज 18लोकमतच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील एका कार्यक्रमाते दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.

गौतमी पाटील आणि तिच्या टीममध्ये या मानधनाचं वाटप झालं तरी गौतमी महिन्याला जवळपास 30-35 लाख रूपये कमावते. नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा होत आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली.

पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे गौतमीने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केला आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे दिवसेंदिवस गौतमीची लोकप्रियता वाढत आहे. लवकरच तिचा ‘घुंगरू’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.