.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्याबाबत अनेक दिवसांपासून वातावरण तापले आहे. या कपलच्या विभक्त होण्याच्या बातम्या खूप चर्चेत आहेत, पण प्रत्यक्षात प्रकरण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काहीजण ही जोडी ब्रेकअप होणार असल्याचं सांगत आहेत तर काहींचं म्हणणं आहे की, असं काही नाहीये. हा प्रसिद्धी साठी केलेला बहाणा आहेत. पण दरम्यान, नुकताच शोएब मलिकचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका लाईव्ह शोमध्ये रडताना दिसत आहे.
शोएब मलिक का रडला :- मलिकच्या डोळ्यात अश्रू येण्याचे कारण सानिया मिर्झा नाहीये. यामागील कारण एक जुनी घटना होती, ज्याचा उल्लेख करत तो रडताना दिसला.
2008 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकाची आठवण करून शोएब मलिक रडू लागला, जेव्हा पाकिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून पहिले विजेतेपद पटकावले होते. शोएब मलिकही या संघाचा एक भाग होता. युनूस खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून पहिले विजेतेपद पटकावले.
युनूस खानच्या या कृतीमुळे शोएब मलिक झाला भावूक :- शोएब मलिकने सांगितले की, 2008 मध्ये जेव्हा तो टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला होता, तेव्हा तो नवीन खेळाडू होता. त्यानंतर कॅप्टन युनूस खानने त्याला बोलावून ट्रॉफी उचलण्यास सांगितले.
नवीन खेळाडूसाठी ही मोठी गोष्ट होती. कर्णधाराचा हा विचार आणि तो क्षण आठवून शोएब भावूक झाला आणि थेट टीव्ही कार्यक्रमातच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
मलिक म्हणाला, “आम्ही 2008 मध्ये टी-20 वर्ल्ड चॅम्पियन झालो, त्यामुळे त्यावेळी मी नवा खेळाडू होतो. त्यानंतर कर्णधार युनूस खानने मला बोलावले आणि तू ट्रॉफी उचलणार असे सांगितले.
टी-20 क्रिकेटमध्ये शोएब मलिकचे पाकिस्तान संघासाठी मोठे योगदान आहे. त्याने पाकिस्तानसाठी 124 सामन्यांच्या 111 डावांमध्ये 31.21 च्या सरासरीने 2435 धावा केल्या ज्यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे.