.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू विराट कोहली आणि हार्दिक पंड्या आनंदाच्या मूडमध्ये दिसले. विराट कोहलीसोबत हार्दिक पंड्या मस्ती करत डान्स करताना दिसत आहे.
हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा मजेदार डान्सिंग व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि हार्दिक चष्मा घालून गाण्याच्या तालावर डोके हलवताना दिसत आहेत.
त्याचवेळी विराट कोहलीही डान्सनंतर आनंदाने हसताना दिसतो. हार्दिक पांड्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
किंग कोहली आणि हार्दिक पांड्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. हे दोन्ही खेळाडू सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करत असतात. सध्या या दोन्ही खेळाडूंनी एका डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत ३ कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ज्याला 4.5 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. जी 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा संघ जाहीर झाला आहे. किंग कोहली पूर्ण जोमात परतला आहे. आशिया चषक 2022 मध्ये त्याने चांगली कामगिरी केली.
You know how we do 😎 @imVkohli pic.twitter.com/YAJVUB5bYP
— hardik pandya (@hardikpandya7) September 18, 2022
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेट-कीपर), दिनेश कार्तिक (विकेट-कीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.