.
अनैतिक संबंध हे पूर्वीपासूनच प्रचलित आहेत. परंतु हल्ली याचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. अस म्हणतात की प्रेमात कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. आणि ते खरेही आहेत. प्रेमात सर्व काही माफ असते. जसे की प्रेमात वय, जात आणि नात्याची कोणतीही सीमा नसते. परंतु हल्ली शारीरीक सबंध प्रस्थापित करणे म्हणजेच प्रेम मानले जाऊ लागले आहे
प्रेमाचा आणि अनैतिकतेचा हा रोग लहान मुला मुलींपासून ते विवाहित महिला आणि पुरुषांपर्यंत पसरला आहे. या क्षणभराच्या सुखासाठी अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. आणि वैवाहिक जीवन उध्वस्त होत चालले आहेत. कॉलेज मधील तरुण मुला मुलींप्रमाणेच विवाहित स्त्री आणि पुरुषांचे देखील आकर्षण वाढत चालले आहे.
असे विवाहित पुरुष देखील परस्त्रीच्या सौंदर्यावर मोहित होतात आणि त्यांच्यासोबत सबंध प्रस्थापित करतात. आज आपण अशीच एक आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जाणून घेणार आहोत. आईचे नाते या जगात सर्वात पवित्र मानले जाते. आई ही तिच्या मुलीसाठी सर्वस्व असते, तिचा मित्र, मैत्रिण आणि तिच्याबद्दल सर्व काही समजून घेणारी असते.
पण, एका आईने या नात्याला लाज आणून आपल्याच मुलीचा विश्वासघात केला आहे. आईने मुलीची फसवणूक अशी केली होती की तिने ज्या व्यक्तीशी तिच्या मुलीने लग्न केले होते त्या व्यक्तीला फसवले आणि तिच्या जावयाशी लग्न केले. खरं तर, लंडनच्या ट्विकेनहॅममध्ये राहणाऱ्या लॉरेन वॉलच्या लग्नाला दोन महिनेही झाले नव्हते की पतीने अचानक घर सोडले.
नातेवाइकांच्या माध्यमातूनच तिला समजले की, तिचा नवरा तिच्या स्वतःच्याच आईसोबत राहू लागला आहे. लॉरेनने 2004 मध्ये पॉलशी लग्न केले. आई जुलीने लग्नात सुमारे 14 लाख रुपये खर्च केले होते. लॉरेनला खूप आनंद झाला आणि तिने तिच्या हनीमूनला तिच्या आईलाही सोबत घेतले. पुढे काय होणार आहे याची त्या मुलीला अजिबात कल्पना नव्हती.
हनीमूनवरून परतल्यानंतर काही वेळातच ज्युली आणि पॉल एकत्र राहू लागले. लॉरेनसाठी हा मोठा धक्का होता. तीला सांभाळणाऱ्या आईनेच तीचा विश्वासघात केला होता. लॉरेनला दुसरा धक्का बसला जेव्हा काही महिन्यांनंतर आई ज्युलीने पॉलच्या मुलाला जन्म दिला. बऱ्याच वर्षांनंतर आई ज्युली आणि पॉल यांचेही लग्न झाले. मुलगी लॉरेननेही या लग्नाला हजेरी लावली होती.
तोच माणूस आपल्या आईशी लग्नाचे वचन देताना पाहत होती, ज्याच्याशी तीने स्वतः लग्न केले होते. ब्रिटिश न्यूज वेबसाइट मिररच्या रिपोर्टनुसार, आई ज्युलीने सुरुवातीला या नात्याला नकार देण्याचा प्रयत्न केला. पण कालांतराने तीने चूक मान्य केली. पण पॉलने कधीच लॉरेनची माफी मागितली नाही. लॉरेन म्हणते की जे घडले त्याचा प्रभाव तिच्यावर बराच काळ राहिला. ती कधीही तिच्या आईला पूर्णपणे माफ करू शकणार नाही.