.
जरी प्रत्येकाला स्टार्सचे जीवन खूप आवडत असले तरी पण त्यांच्या आयुष्यातील अडचणी फक्त त्यांनाच माहित असतात. लोकांना हसवणे हे सामान्य काम नाही. कॉमेडी शोचा जज होणं त्याहूनही अवघड असतं. सगळ्यांना माहित आहे की अशा शोच्या जज्जना प्रत्येक विनोदावर हसावे लागते.
सगळ्यात जास्त हसण्यासाठी कोणी प्रसिद्ध असेल तर ती अर्चना पूरण सिंह. अर्चना कपिलच्या शोमध्ये जज्ज म्हणून दिसली आणि शो दरम्यान ती सतत हसत राहते. अर्चनाने सांगितले की, एकदा तिला तिच्या सर्वात दुःखद क्षणातही 15 मिनिटे सतत हसावे लागले होते.
अर्चनाने याविषयी सांगितले की, सासूची तब्येत खूप खराब होती पण शूटिंगच्या कमिटमेंटमुळे तीला शो च्या सेट वर यावे लागले होते. अर्चनाने सांगितले की, “ही कॉमेडी सर्कसबद्दल आहे. मी शूटिंग करत असताना माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि मला शूटिंगला हजेरी लावायची होती.
मी शूटिंग साठी आले होते आणि संध्याकाळी सहा वाजता मला समजले की माझ्या सासूचे निधन झाले आहे. मी शूटिंग करणाऱ्यांना सांगितले की मला लगेच निघून जावे लागेल. माझ्या सासूचे निधन झाले आहे. तेव्हा मला सांगण्यात आले होते की मॅडम फक्त 15 मिनिटांची तुम्ही तुमची शूटिंग पूर्ण करा आणि मग त्यानंतर तुम्ही निघून जाऊ शकता.
अर्चनाने पुढे सांगितले की, “शोमधील माझी प्रतिक्रिया नेहमीच हसणारी होती. पंच, बडा पंच, छोटा पंच, छोटा हंसा, बडा हंसा, असे करत मी १५ मिनिटे शूट केले. त्यावेळी मी मोठ्याने हसत होते आणि आतून रडतही होते. मला तो सर्वात कठीण काळ वाटला पण ती माझी असहायता होती.
देव अशी परिस्थिती कोणावरही आणू नये.” अर्चनाचे हे बोलणे ऐकल्यानंतर तुम्हालाही कल्पना येईल की अनेकवेळा एखाद्या कलाकाराला इतक्या अडचणींचा सामना करावा लागतो.