.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आणि सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री स्मृती इराणी यांची कन्या शनेल इराणीने या महिन्यात ९ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर शहरातील एका सुंदर किल्ल्यात शनेलने अर्जुन भल्लासोबत लग्नगाठ बांधली आहे.
शनेल आणि अर्जुनच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी, लग्नानंतर, शनेल आणि अर्जुनच्या लग्नाच्या भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूड पासून टीव्ही जगतातील अनेक स्टार्सनी आपली उपस्थिती नोंदवली होती.
बॉलिवूडचा ‘पठाण’ शाहरुख खानही लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला होता. लग्नाच्या रिसेप्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एक नजर टाकूया फोटोजवर…
स्मृती इराणी आणि झुबिन इराणी यांची मुलगी शानेल इराणी हिचे लग्नाचे रिसेप्शनही राजस्थान मध्येच पार पडले. ‘पठाण’ म्हणजेच शाहरुख खान रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता. लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खानसोबत मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियारही दिसत आहेत.
शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या रिसेप्शन पार्टीत टीव्ही क्वीन एकता कपूर तिचे वडील अभिनेते जितेंद्रसोबत पोहोचली होती. त्याचवेळी भोजपुरी अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनीही सहभाग घेतला. तर, टीव्हीवर स्मृती इराणीच्या पतीची भूमिका करणारा अभिनेता रोनित रॉय पत्नी नीलमसोबत पार्टीत सहभागी झाला होता.
यादरम्यानचे सर्व फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. तसेच रिसेप्शन चा व्हिडीओ देखील समोर आला आहे.