
वैभवीने म्हणजेच अभिनेत्री सानिया चौधरीने हा स्टंट स्वत: पूर्ण केला आहे. हा भयानक स्टंट तिने खूप धाडसाने केला आहे.
‘सांग तू आहेस का’ ही स्टार प्रवाहवरील मालिका सध्या एका चांगल्याच रोमांचक वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत आता डॉक्टर वैभवीला स्वराजच्या पत्नीच्या मृत्यू मागील खरं सत्य लक्षात येणार आहे.
या भागाचा प्रोमो सध्या वाहिनी वर दाखवण्यात येत आहे. या प्रोमोमध्ये जेव्हा स्वराजची मृत पत्नी वैभवी ही डॉक्टर वैभवीला स्पर्श करते तेव्हा डॉक्टर वैभवीला स्वराजच्या पत्नीचा इमारतीवरून पडून कसा मृत्यू झाला याचं दृश्य तिला तिच्या फोल्यासमोर दिसतं.
या प्रोमोत डॉक्टर वैभवीला दिसलेल्या घटनेत स्वराजची मृत पत्नी वैभवी अनेक फूट उंच इमारतीवरून खाली स्वराजच्या गाडीवर कोसळताना दिसतेय. मालिकेच्या या सीनसाठी मालिकेच्या टीमने खूप जास्त मेहनत घेतली आहे.
एवढचं नाही तर या स्टंटसाठी अभिनेत्री सानिया चौधरीने म्हणजेच मृत वैभवीने खूप मोठं धाडस दाखवुन स्वतः हा स्टंट पूर्ण केला आहे. अभिनेत्री सानियाने हा सीन करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.
हा व्हिडिओ पहिला असता तुम्हाला दिसेल की सानिया सुरवातीला अत्यंत घाबरलेली होती .सानियाला एका क्रेनला बांधण्यात आले होते. क्रेनच्या साहाय्याने तिला वर वर नेण्यात आले, जसजशी ती वर जात होती तसतशी तिला अजूनच भिती वाटायला लागली. नंतर मात्र तिने अजिबात न डगमगता हा सीन खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केला.
खरं तर या सीनसाठी तशी संपूर्ण टीमनेच खूप मेहनत घेतल्याचं दिसतंय. परंतु या सीनमध्ये वैभवी उंच इमातीवरून खाली पडत आहे असं दृष्य चित्रित करायचं होत. म्हणून या सीनसाठी वैभवीचा चेहरा दिसणं खूप महत्त्वाचे होते.
कोणत्याही स्टंटमॅनचा वापर न करता हे दृश्य यशस्वीरित्या चित्रित करण्यात आलंय. हा सीन यशस्वीपणे शूट झाल्यानंतर सर्वानीच अभिनेत्री सानियाचं खूप कौतुक केले. इन्स्टाग्रामवर अभिनेत्री सानिया चौधरीने तिच्या या स्टंटबद्दलचा अनुभवसुद्धा शेअर केलेला आहे.
बघा विडिओ :