.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनय आणि सुंदरतेच्या जोरावर ती लोकांच्या मनावर राज्य करत असे. श्रीदेवी आज या जगात नाही, पण ती सदैव तिच्या कुटुंबीयांच्या आणि प्रियजनांच्या हृदयात राहील.
तुम्हाला श्रीदेवीबद्दल (Sridevi) बरंच काही माहित असेल पण तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल. चला तर मग श्रीदेवीची बहीण आणि जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) मावशी श्रीलता यांच्याबद्दल जाणून घेऊयात ज्या खूप सुंदर आहेत.
श्रीलता श्रीदेवीच्या सेटवर यायच्या :- श्रीदेवी तिची बहीण श्रीलतावर जीव ओवाळून टाकायची. श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिला अभ्यास सोडावा लागला. जेव्हा श्रीदेवी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असायची तेव्हा अनेकदा श्रीलता तिच्या सेटवर जायची आणि तिच्या गरजा भागवायची.
श्रीदेवीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र होती, मात्र मोठ्या पडद्यापासून दूर असलेली तिची बहीण देखील सौंदर्यात कुणापेक्षाही कमी नव्हती. श्रीलता खूप सुंदर आणि मनमोहक आहे, तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
प्रत्येक प्रसंगात श्रीदेवी सोबत असायची :- श्रीदेवी आणि श्रीलता खऱ्या बहिणी असण्यासोबतच खूप चांगल्या मैत्रिणी देखील होत्या. श्रीदेवीच्या यशस्वी कारकिर्दीमागे तिच्या बहिणीचाही मोठा हात असल्याचे म्हटले जाते. श्रीलता 1972- 1993 पर्यंत श्रीदेवीच्या पाठीशी उभ्या होत्या. श्रीलताने आपल्या बहिणीच्या गाण्याचा आणि नाचतानाचा व्हिडिओ शूट केला होता. श्रीलताचे लग्न झाले तेव्हा श्रीदेवीला अपूर्ण वाटले. याचा उल्लेखही त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये केला होता.
प्रसिद्धीच्या झोतात राहते :- श्रीदेवीचाही मृ’त्यू झाला तेव्हा श्रीलता बाहेर आली नाही. तिच्या पतीने चेन्नईतील एका प्रार्थना सभेला हजेरी लावली होती आणि सांगितले होते की, श्रीलता आपल्या बहिणीच्या मृ’त्यूच्या शो’कामुळे प्रसिद्धीच्या झोतात येऊ इच्छित नाही. श्रीलता सध्या चेन्नईमध्ये राहते आणि तिला प्रसिद्धी झोतात राहणे आवडत नाही. तिला फक्त सामान्य जीवन जगायला आवडते.
Srilata : "We vibe so well that we are more like best friends than sisters."#Sridevi #SrideviLivesForever #ProudSridevians #SrideviKapoor #Sridevians #SrideviForever #RIPSridevi #srilata pic.twitter.com/bciBMF7F3v
— Sridevi Sena (@ProudSridevians) April 24, 2021
जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट :- श्रीदेवीला जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. जान्हवी कपूरच्या ‘मिली में’ चित्रपटानंतर आता ती राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मध्ये दिसणार आहे. यानंतर ती वरुण धवनसोबत बावल या चित्रपटात दिसणार आहे. वरूण जान्हवीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे.