.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी तीच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या अनोख्या मिलाफासाठी प्रसिद्ध होत्या. तिच्या डान्समुळेही ती चर्चेत राहायची. त्याचवेळी लोकांना तीच्या अभिनयाचे वेड लागले होते. ती आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकत असे. लोक तीचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असायचे आणि ते पडद्याकडे एकटक बघतच राहायचे.
नगीना, चांदनी, मिस्टर इंडिया अशा अनेक चित्रपटात तीने काम केले. आज भलेही ती आपल्यात नसेल, पण तीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. श्रीदेवीला जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. याव्यतिरिक्त श्रीदेवीच्या कुटुंबात एक बहीण देखील आहे हे सर्वांना माहीतच असेल असे नाही. होय, श्रीदेवीला एक बहीणही आहे. जीच्याबद्दल लोकांना माहिती नाही.
श्रीदेवीची बहीण श्रीलता दिसतेय इतकी सुंदर :- श्रीदेवीने वयाच्या अवघ्या 4 थ्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि काम करण्यासोबतच तीने तिचे शिक्षण देखील पूर्ण केले नाही. ती तिच्या शूटिंगमध्ये व्यग्र असायची. त्यामुळे तिला अभ्यास करता येत नव्हता आणि ती तिची धाकटी बहीण श्रीलताला देखील तिच्या सेटवर घेऊन जायची. तिथ बहिणीची ती खूप काळजी घेत असे.
@SrideviBKapoor with her younger Sister #Srilata A Very Rare one plz RT if u liked 🙂 pic.twitter.com/NwonJ9Welc
— Puneet Sharma ❄ (@puneetsharma7) May 19, 2013
श्रीलता फक्त बहिणच नाही तर एक चांगली मैत्रीण देखील होती :- श्रीदेवीची धाकटी बहीण तिची मैत्रीण देखील होती. अभिनेत्रीला सपोर्ट करण्यात तिची बहीण श्रीलता हिने सर्वाधिक योगदान दिले. 30 वर्षे बहिणीसोबत प्रत्येक पावलावर उपस्थित होती. आणि लग्नानंतरही तिला बहिणीची खूप आठवण यायची.
श्रीलताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती लाइमलाइटपासून दूर राहते. बहिणीच्या मृ’त्यूने तिला इतके दु:ख झाले होते की ती तिच्या प्रार्थना सभेलाही गेली नाही. श्रीलता खूप सुंदर आणि निरागस आहे. लोक तीच्या निरागसतेच्या प्रेमात पडले.