.
करिअर करायचं म्हटलं की, संघर्ष करावाच लागतो. मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो. आज आपण बॉलिवूड विश्वातील अभिनेते आणि अभिनेत्रींचे चकमकीत आलिशान आयुष्य पाहतो. ते किती सुखात जगतात त्यांच आयुष्य आपल्यापेक्षा लयभारी असचं सर्वांना वाटत असत. पण त्यांनाही पद्यामागे किती संघर्ष करावा लागत असेल याचा विचार कधी केलंय का?
आज आपण अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने चक्क ग’रोदर असताना बॉलिवूड विश्वाला जबरदस्त चित्रपट दिला आहे. 90 च्या दशकातील चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलच राज्य केलं आहे. आजही प्रेक्षक जुने चित्रपट आवडीने पाहतात. त्यापैकीच एक असलेला चित्रपट म्हणजे ‘सत्ते पे सत्ता’ होय.
हा चित्रपट त्या काळी ब्लॉकबस्टर ठरला होता. या सुपरहिट चित्रपट बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल असणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini) यांनी काम केले होते. राज सिप्पी दिग्दर्शित, हा चित्रपट त्याच्या उत्कृष्ट गाणी, मजेदार दृश्ये, रोमँटिक क्षण आणि उत्कृष्ट कॉमेडीसाठी नेहमीचं लक्षात ठेवला जातो.
या चित्रपटाशी संबंधित अशा अनेक कथा आहेत, ज्याच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल. या चित्रपटाची नायिका हेमा मालिनी या शूटिंगदरम्यानच गरोदर होत्या. ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटात हेमा मालिनी चक्क प्रेग्नंट असून देखील त्यांनी एकदम चोख भूमिका साकारली. त्याचवेळी त्या चित्रपटातील एका गाण्यात त्यांचा बेबी बंप लपवताना दिसल्या.
खरं तर, सुरुवातीला या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रेखा यांचे नाव फायनल करण्यात आले होते. मात्र, रेखा यांचे अमिताभ यांच्यासोबतचे बिघडलेले नाते पाहून निर्मात्यांनी रेखा ऐवजी ग्लॅमरस अभिनेत्री परवीन बाबीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता. कारण तिने यापूर्वी 8 चित्रपटांमध्ये अमिताभसोबत काम केले होते.
पण परवीनने चित्रपटसृष्टी सोडून अध्यात्माचा मार्ग पत्करल्याचे कळताच निर्मात्यांची निराशा झाली. यानंतर खुद्द अमिताभ बच्चन यांनीच हेमा मालिनी यांचे नाव ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटासाठी सुचवले होते. त्यानंतर हेमाला फायनल करण्यात आले. पण हा चित्रपट शूट करणे तिच्यासाठी इतके सोपे नव्हते. आश्चर्यकारक बाब म्हणजे हेमा मालिनी शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होत्या.
अशा परिस्थितीत त्यांना खूप काळजीपूर्वक काम करावे लागले आणि त्यासाठी जास्त वेळही लागला. या चित्रपटातील ‘परियों का मेला है’ या गाण्यात हेमा मालिनी यांचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत होता. निर्मात्यांनी शाल पांघरून लपविण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर प्रेग्नेंसीमुळे हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, त्यांचे जास्त शॉट्स क्लोज-अप घेतले पाहिजेत जेणेकरून त्यांचा बेबी बंप दिसू नये.
चित्रपटादरम्यान प्रेग्नेंसीमुळे हेमा मालिनी यांचे वजन खूप वाढले होते, जे चित्रपटाच्या कथेनुसार परफेक्ट होते. मात्र, हेमाच्या गरोदरपणामुळे या चित्रपटाचे शूटिंग जवळपास वर्षभर लांबले. हेमा मालिनी शूटिंगनंतर आणि रिलीजच्या दोन महिन्यांपूर्वीच आई बनली.
हेमा यांनी 2 नोव्हेंबर 1981 रोजी पहिली मुलगी ईशा देओलला जन्म दिला. दोन महिन्यांनंतर म्हणजेच 22 जानेवारी 1982 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या काळात, हा चित्रपट फक्त 1 कोटी 60 लाखांमध्ये बनला होता. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 4.25 कोटींचा व्यवसाय केला होता.