शिल्पा शेट्टीला तिच्या जीवनात ‘या’ विचित्र घटनांचा करावा लागला होता ‘सामना’, ज्यामुळे तीला आजही लोक देत आहे ‘शिव्या’…

बॉलिवूड

.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या पोर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगात जावे लागले. राज कुंद्रा यांनी पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायात केवळ पैसाच गुंतवला नाही, तर त्यातून त्यांना मोठा नफाही मिळत होता, असा आरोप आहे.

या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली होती. याशिवाय अभिनेत्रीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज कुंद्राचा दीर्घकाळ वादांशी सं’बंध आहे.

कुंद्रावर अनेकदा फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्यावर आयपीएलमध्ये फिक्सिंगचा आरोपही करण्यात आला आहे. राज हा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक होता. राज कुंद्राच नाही तर त्यांची पत्नी शिल्पा शेट्टीही अनेकदा वादात सापडली आहे. तीच्याशी संबंधित काही वाद आज आपण बघणार आहोत.

शिल्पा शेट्टीच्या किसिंगचा वादही जोरात चर्चेत होता. खरं तर, शिल्पा शेट्टीचा एका पुजाऱ्याशी सं’बंधित वादही चर्चेत होता. 2009 मध्ये शिल्पा शेट्टी ओडिशातील साक्षीगोपाल मंदिरात पोहोचली होती. येथे एका पुजाऱ्याने तीच्या गालावर चुंबन घेतले होते. पुजारी आणि शिल्पाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला पुन्हा लोकांनी ट्रोल केले.

त्यानंतर शिल्पा म्हणाली होती की पुजारी तिच्या वडिलांच्या वयाचा आहे. यापूर्वी हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने 2007 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान शिल्पा शेट्टीचे चुंबन घेतले होते. किसचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड एका जनजागृती कार्यक्रमासाठी भारतात आला होता.

या कार्यक्रमात शिल्पाही सहभागी झाली होती. यादरम्यान रिचर्ड गेरे यांनी शिल्पाला वारंवार मिठी मारली आणि त्यानंतर त्यांनी स्टेजवर सर्वांसमोर अभिनेत्रीचे चुंबन घेतले. या किसिंग सीनबाबत शिल्पाने सांगितले की, घटना इतकी अचानक घडली की तिला सावरण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेमुळे शिल्पा शेट्टीला देशभरातून मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.