शाहरुख खानचा मुलगा ‘आर्यनने’ धुडकावून लावली करण जोहरची ही खास ‘ऑफर’, समोर आले धक्कादायक कारण…

बॉलिवूड

.

करण जोहरने आर्यन खानला त्याच्या चित्रपटासाठी एकदा नव्हे तर अनेक वेळा संपर्क साधला होता. पण प्रत्येक वेळी त्याला नकार ऐकावा लागला आणि आता परिस्थिती अशी आहे की करणने आर्यनला चित्रपट सांगणेच बंद केले आहे. निर्माता दिग्दर्शक म्हणून करण जोहर बॉलिवूड स्टार किड्स लाँच करण्यासाठी प्रसिद्ध आहे .

आणि वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो त्याचा खास मित्र शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला लॉन्च करण्याच्या तयारीत होता. पण स्टार किडने त्याची ऑफर नाकारली आहे. आर्यनने केवळ करण जोहरचीच नाही तर झोया अख्तरची ऑफरही नाकारली आहे आणि जे कारण समोर येत आहेत ते धक्कादायक आहेत, असंही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.

करणने अनेक वेळा आर्यनला संपर्क केला :- एका रिपोर्टमध्ये एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “याची सुरुवात खूप गंभीर ऑफर म्हणून झाली होती. जेव्हा करण जोहरने आर्यन खानला लॉन्चसाठी ऑफर दिली तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. सुरुवातीला करणला वाटले की बच्चा घर की बात है. आ जायेगा.

पण आर्यनने त्याची ऑफर स्वीकारण्यास नकार दिला.” असे म्हटले जाते की, नंतर आर्यनच्या कुटुंबीयांना समजले की त्याला अभिनयात करिअर करण्यात खरोखर रस नाही. करण जोहरला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने गंमतीने आर्यन खानला चित्रपट सुचवणे बंद केले होते.

झोया अख्तरचा चित्रपटही नाकारला :- रिपोर्ट्सनुसार, जोया अख्तरने आर्चीच्या कॉमिक बुक्सवर आधारित असलेल्या तिच्या आगामी चित्रपटात आर्यनला लॉन्च करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु आर्यनने तेव्हाही हा चित्रपट करण्यास नकार दिला. शाहरुख खानची मुलगी सुहाना झोयाच्या चित्रपटात काम करत असून सुहाना शाहरुख खानचा अभिनय वारसा पुढे नेईल असे मानले जाते.

आर्यन खानला अभिनेता बनायचे नाही :- एका मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार, आर्यन खानला हिरोचा लूक मिळूनही त्याच्या वडिलांसारखा अभिनेता बनण्याची इच्छा नाही. दिग्दर्शक बनून कॅमेऱ्याच्या मागे उभं राहण्याची त्याची इच्छा असल्याचं सांगण्यात येत आहे. एका संभाषणात शाहरुख खानने देखील त्याचा मुलगा आर्यनला अभिनयात रस नसल्याचे पुष्टी केली आहे.

शाहरुख खान म्हणाला होता की, आर्यन किंवा सुहाना दोघेही कलाकार बनण्याचे स्वप्न पाहत मोठे झालेले नाहीत. शाहरुख खानने असेही सांगितले की, आपल्या मुलीला अभिनेत्री बनायचे आहे आणि त्यासाठी ती शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन-चार वर्षांसाठी अभिनयाचा कोर्स करणार आहे. तो म्हणाला होता, “आर्यनला अभिनेता बनायचे नाही. त्याला चित्रपट बनवायचे आहेत, दिग्दर्शक बनायचे आहे आणि त्यासाठी तो यूएसमध्ये प्रशिक्षणही घेत आहे.”

आर्यन खान वेबसीरिजमध्ये काम करत आहे :- रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान सध्या इस्त्रायली दिग्दर्शक लिओर राज यांच्या मदतीने वेबसिरीज बनवण्यासाठी त्याच्या पहिल्या लेखन प्रकल्पावर काम करत आहे. ‘फौदा’सारखे अॅक्शन-थ्रिलर बनवणाऱ्या लिओरला आर्यन खानचे वडील शाहरुख खान यांनी कामावर घेतल्याचे सांगितले जाते. या वर्षाच्या अखेरीस ही मालिका प्रदर्शित होऊ शकते, असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.