.
अलीकडेच इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल व्याटने आपल्या गर्लफ्रेंडशी एंगेजमेंट केली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॅनियल व्याट ही पुरुष नसून एक महिला खेळाडू आहे. डॅनियलने तीच्या एंगेजमेंटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2014 मध्ये डॅनियल व्याटने विराट कोहलीला ट्विटरवर लग्नासाठी प्रपोज केले होते. डॅनियल व्याट शेवटचा टी-२० विश्वचषक खेळली होती. टी-20 विश्वचषकात इंग्लंड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र या संघाचा उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला.
या पराभवानंतर आता बातमी येत आहे की, इंग्लंड संघाच्या या खेळाडूने आपल्या महिला जोडीदाराशी एंगेजमेंट केली आहे. त्याचा एक फोटो डॅनियलने तीच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
डॅनियल व्याटची क्रिकेट कारकीर्द :- डॅनियल व्याट ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. ती इंग्लंड संघात क्रिकेट खेळते. तीने आतापर्यंत 102 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तीने एकूण 1776 धावा केल्या आहेत. जर आपण T20 सामन्यांबद्दल बोललो, तर तीने इंग्लंडसाठी 143 T20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तीने 2369 धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर डॅनियलने वनडेमध्ये 27 आणि टी-20मध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत.
विराट कोहलीशी लग्न करण्याचे होते स्वप्न :- 2014 मध्ये डॅनियल व्याटने भारतीय संघाचा खेळाडू विराट कोहलीला ट्विटरवर प्रपोज केले होते. काही काळानंतर डॅनियलचे नाव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबतही जोडले गेले. पण नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार, तीने आपल्या महिला जोडीदाराशी एंगेजमेंट केली आहे.