नमस्कार !
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटातून जात आहे आणि पैशाच्या बाबतीत तो खूपच त्रस्त आहे. कांबळीला क्रिकेटशी संबंधित कोणतेही काम मिळाले तरी तो त्यासाठी तयार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 50 वर्षीय माजी क्रिकेटपटू मंगळवारी मुंबईतील एका कॉफी शॉपमध्ये बसलेला दिसला तेव्हा त्याला ओळखणे कठीण झाले होते.
सामान्यतः सोन्याच्या चेन, स्टायलिश कॅप्स आणि आलिशान ड्रेसमध्ये दिसणारा कांबळी अगदी साधा दिसत होता. कांबळी म्हणाला, “मला असाइनमेंट हवे आहे जिथे मी तरुणांसोबत काम करू शकेन. मला माहित आहे की मुंबईने अमोल (मझुमदार) यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून ठेवले आहे, पण माझी गरज पडल्यास मी तिथे असू शकेल.
आम्ही एकत्र खेळलो आणि आमचा एक उत्तम संघ होता. माझी अशी इच्छा आहे की सध्याचा मुंबई संघाने एक संघ म्हणून खेळावे. कांबळी पुढे म्हणाला, “मी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) ची मदत घेत होतो. मी CIC [क्रिकेट रिफॉर्म कमिटी] मध्ये प्रवेश घेतला, पण ते एक मानाचे काम होते. मी एमसीएकडे काही मदतीसाठी गेलो होतो.
मला एक कुटुंब आहेत आणि कुटुंबाची देखभाल करण्याची जीम्मेदारी माझ्यावर आहे. मी एमसीएला बर्याचदा सांगितले की तुम्हाला माझी गरज असेल तर मी तिथे नियमित असेल मग ते वानखेडे स्टेडियम असो किंवा बीकेसी. मुंबई क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. या खेळासाठी मी आयुष्यभर ऋणी आहे.”
विनोद कांबळी यांनी सांगितली त्यांची समस्या :- विनोद कांबळी यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की मी पहाटे ४ वाजता उठायचो, डीवाय पाटील स्टेडियमपर्यंत कॅबने जायचो. त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ग्राऊंडवर शिकवलं, जे खूप अवघड काम होतं.
विनोद कांबळीने मिड डेला सांगितले की, मी फक्त बीसीसी आयच्या पेन्शनवर अवलंबून आहे, मी कामासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही गेलो होतो. मला आशा आहे की मला काही काम मिळेल. मिळेल ते काम करण्याची माझी तयारी असेल.