विद्या बालनसोबत ‘या’ निर्मात्याने केले होते ‘असं’ कृत्य की अभिनेत्रीला 6 महिने आरशात तोंड पाहणं झाले होते ‘मुश्किल’…! वाचून धक्काच बसेल..

बॉलिवूड

.

बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव व प्रसिद्धी मिळवणे काही सोपी गोष्ट नाही. आतापर्यंत भल्या मोठमोठ्या कलाकारांची यशाचं शिखर गाठताना दमछाक झाली आहे. बोटावर मोजण्या इतके कलाकार कलाविश्वात असतील ज्यांना सहज यश मिळाले. आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूड विश्वात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन होय.

आज विद्या बालनला कोणत्याही परिचयाची गरज नाही. कारण आज बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ती एक प्रसिद्ध नाव बनली आहे. विद्या बालनने बॉलिवूडमधील एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची दमदार कामगिरी दाखवली आहे. तुम्हाला माहिती आहे का? की भिनेत्रीला हे यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता.

विद्या बालनला देखील इंडस्ट्रीमध्ये प्रचंड वाईट वागणूक मिळाली. अभिनेत्री विद्या बालनसोबत एका निर्मात्याने असे कृत्य केले की, अभिनेत्रीला 6 महिने तिचा चेहरा आरशात पाहता आला नाही. तिची मनस्थिती इतकी खालावली होती की, तिला सहा महिने हा त्रास सहन करावा लागला होता. याबाबत खुद्द अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.

जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. अभिनेत्री सोबत हे कृत्य कोणत्या निर्मात्याने केलं हे जाणून घेऊया. एका रात्रीत विद्या बालनला चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तिला एकापाठोपाठ अनेक रिजेक्शन मिळाले. जवळपास 13 चित्रपटांमध्ये तिची जागा दुसऱ्यांना देण्यात आली. जे तिच्यासाठी खूपच दुःखद होते.

अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा एका निर्मात्याने तिला रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. एवढेच नाही तर तिला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. ज्यानंतर अभिनेत्री स्वतःशी नजर मिळवू शकली नाही. तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. मात्र, आता या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ज्या निर्मात्यांनी एकेकाळी तिला नाकारले आणि तिच्याशी गैरवर्तन केले, ते आता तिला त्यांच्या चित्रपटात घेण्याविषयी बोलतात. ते तिला कॉल करतात आणि तिला त्यांच्या चित्रपटात काम करण्यास विचारतात. पण आता विद्याने त्यांना नकार दिला आहे. यासोबतच विद्याने बालचंदरच्या एका चित्रपटाची कथा शेअर केली आणि तिला तिथूनही काढून टाकल्याचे सांगितले.

मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे तिला याबाबत माहितीही देण्यात आली नाही. त्यानंतर विद्याच्या आईने चित्रपटाच्या शूटिंगबाबत प्रश्न विचारला असता विद्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेत्री आगामी काळात ‘जलसा’ चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ज्याच्या प्रमोशनदरम्यान विद्याने या गोष्टी सांगितल्या. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिच्या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. विद्या आणखी एका चित्रपटात काम करत आहे. ज्यामध्ये ती प्रतीक गांधीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र, सध्या या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.