लाईव मॅचमध्येच चाहता ‘ऋषभ’ला म्हणाला “भाई उर्वशी बुला रही है”, ऐकून ऋषभ पंतने दिली विचित्र प्रतिक्रिया, म्हणाला तू जाऊन…

बॉलिवूड

.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट चाहते उर्वशी रौतेला नावाने पंतला चिडवताना दिसत आहेत. ही घटना टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याची आहे.

या व्हिडिओमध्ये मैदानावर उपस्थित असलेले क्रिकेट चाहते सामन्यादरम्यान ऋषभ पंतला चिडवण्याचा प्रयत्न करत होते. चाहते ऋषभ पंतसमोर उर्वशी रौतेलाचे नाव घेताना दिसले. आणि आता पंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बांगलादेश विरुद्धच्या या सामन्यात ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता पण तो 12 वा खेळाडू म्हणून मैदानावर ड्रिं’क घेताना दिसत आहे. दरम्यान, काही चाहत्यांनी ऋषभ पंतला ‘भाई उर्वशी बुला रही है”, असे मोठ्याने ओरडून सांगितले. त्यामुळे ऋषभनेही त्यांना आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. त्या चाहत्यांना उत्तर देताना पंत म्हणाला, ‘जाके ले ले फिर’

अ‍ॅडलेड ओव्हलवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्याची स्थिती सांगितली तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पावसाने सामना व्यत्यय आणला.

त्यानंतर बांगलादेशला डीएलएस नियमानुसार 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य देण्यात आले. यानंतर बांगलादेशला केवळ 6 गडी गमावून केवळ 145 धावा करता आल्या आणि टीम इंडियाने 5 धावांनी सामना जिंकला. दुसरीकडे, जर आपण ऋषभ पंतबद्दल बोललो, तर टीम इंडियाने आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 12 ग्रुप टू टप्प्यात 5 सामने खेळले आहेत.

त्यापैकी पंतला फक्त एकदाच झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. आणि या मॅचमध्ये त्याला फक्त 3 धावा करता आल्या. आणि आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये आता टीम इंडियाची दुसरी सेमीफायनल 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.