लग्नाला नकार दिला नसता तर आज अभिषेखच्या नावाचे कुंकू लावून बच्चन कुटुंबाची सून बनून मिरवत असती हेमा मालिनीची मुलगी…

बॉलिवूड

.

बॉलिवूड इंडस्ट्रीत लग्न आणि अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूड कलाकारांना अनेकदा त्यांच्या सहकलाकारांसोबत लग्न करायला आवडते, जे अनेकदा मीडियाच्या चर्चेत असतात. बॉलीवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी यांनाही तिची मुलगी ईशा देओलचे लग्न अभिषेक बच्चनसोबत करायचे होते.

मी अभिषेक बच्चनला माझा भाऊ म्हणून पाहते :- ईशा देओल म्हणते की ती अभिषेक बच्चनला तिचा भाऊ म्हणून पाहते, त्यामुळे त्याच्याशी लग्न करण्याचा विचार तिच्या मनात कधीच आला नव्हता. ईशाने एका मुलाखतीत हे सांगितले होते. खरंतर, हेमा मालिनी यांनी करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनसारखा जावई असण्याची इच्छा सांगितली होती.

यावर प्रतिक्रिया देताना ईशा देओल म्हणाली की, माझी आई खूप गोड आहे. तीने अभिषेकचे नाव घेतले कारण तो सध्या मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. मी माझ्या आयुष्याची सुरुवात एका चांगल्या व्यक्तीसोबत करावी अशी तिची इच्छा होती आणि अशा परिस्थितीत तिला अभिषेक बच्चन सर्वात चांगला आवडतो पण मी नेहमीच अभिषेक बच्चनला भाऊ म्हणून पाहिले, त्यामुळे मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. म्हणून हेमा मालिनीला इच्छा असून देखील पण ईशा देओलने नकार दिल्याने हे लग्न होऊ शकले नाही.

विवेक तर अजिबात नाही, तो माझ्या टाईपचा नाही :- अभिषेकशिवाय ईशाचे नाव विवेक ओबेरॉयसोबतही जोडले गेले आहे. बातम्यांनुसार, हेमा मालिनी यांना विवेक ओबेरॉय देखील सक्षम वाटला होता पण यावर ईशा देओल म्हणाली होती की, आईला देखील तिला काय विचार करते हे माहित नाही. विवेक तर अजिबातच नको. तो माझ्या टाईपचा नाही.

ईशा देओलने शाळेतील मित्रासोबत लग्न केले :-

ईशा देओलचे लग्न एका प्रसिद्ध उद्योगपतीसोबत झाले आहे आणि त्यांना दोन मुलीही आहेत. 2012 मध्ये तीने भरत तख्तानीसोबत सात फेऱ्या मारल्या. दोघेही शाळेच्या वेळेपासून एकमेकांना ओळखत होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.