.
अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर स्पर्धकांना केवळ प्रश्नच करत नाहीत तर त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टीही शेअर करतात. अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा असेच काहीसे शेयर केले आहे. त्यांनी शोमध्ये सांगितले की रेखाला सोडून त्यांनी जया बच्चनशी लग्न का केले होते.
बिग बी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. ते अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहतात. आजकाल ते त्यांचा क्विझ आधारित रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करत आहे. या शोचे सूत्रसंचालन करताना त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ घालवला आहे.
अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर स्पर्धकांना केवळ प्रश्नच करत नाहीत तर त्यांच्या वयक्तिक आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टीही प्रेक्षका सोबत शेअर करत असतात. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचा खुलासा केला आहेत. एकेकाळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीला लोक खूपच पसंत करत होते. परंतु असे काय झाले की त्यांनी रेखाला सोडून जया बच्चनशी लग्न केले.
केबीसी 14 चा आगामी भाग :- वास्तविक, सोनी चॅनलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर KBC 14 च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. KBC (KBC 14) च्या आगामी भागात, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकणारी स्पर्धक प्रियंका महर्षी हॉटसीटवर बसलेली दिसणार आहे.
प्रोमोमध्ये बिग बी स्पर्धकाच्या केसांची प्रशंसा करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी आधी तिचा प्रोफेशन विचारला, त्यानंतर स्पर्धक सांगते की ती अॅकॅडमी ऑफ ब्युटी अँड वेलनेसमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे. यानंतर बिग बी त्यांना केस दाखवण्यास सांगतात.
त्यांनी जयाशी लग्न का केले ते सांगितले :- प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की स्पर्धकाच्या केसांची प्रशंसा केल्यानंतर अमिताभ बच्चन म्हणतात, “आम्ही आमच्या पत्नीशी लग्न केले कारण तिचे केस खूप लांब होते.” याशिवाय बिग बींनी स्पर्धकाला तीच्या दोन्ही हातांवर बनवलेल्या टॅटूचा अर्थही विचारला. एवढेच नाही तर त्यांनी स्पर्धकांसोबत अनेक मजेशीर गोष्टीही केल्या.
1973 मध्ये जयाशी लग्न केले :- अमिताभ बच्चन यांचे लग्न जया बच्चन यांच्याशी 1973 मध्ये झाले होते. अमिताभ आणि जया यांना एक मुलगी व एक मुलगा असून त्यांची नावे श्वेता आणि अभिषेक आहेत. अमिताभ बच्चन यांना फॅमिली मॅन म्हटले जाते.