। नमस्कार ।
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात, एका स्थानिक व्यक्तीने एका कुत्र्यासह झोपलेल्या एका असहाय मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आणि हा फोटो आता सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन कुंभकर्णी झोपेतून उठल आणि कारवाईस लागल आणि उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हा पोलिसांना हा असहाय्य मुलगा सापडला.

जेव्हा असहाय निष्पापी मुलाला पोलिसांनी रस्त्यावर झोपण्या मागचे कारण विचारले तेव्हा मुलाची कहाणी इतकी भावनिक होती की कोणाच्याही डोळ्यातून अश्रू येतील. सुमारे ९ ते १० वर्षाचा असहाय्य दिसणारा मुलगा आपले नाव अंकित असे सांगत होता. मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील तुरूंगात आहेत आणि आई त्याला सोडून निघून गेली आहे.
या निरागस मुलाला प्रवास करता येत नाही आणि त्याला आपल्या कुटूंबाविषयी किंवा घराबद्दल काहीच माहिती नाही आहे. हा निष्पाप मुलगा चहाच्या दुकानात काम करून किंवा कचरा उचलून आपले जीवन जगत आहे. तो आपला सोबती कुत्र्यालाही जेवायला देतो, ज्यास तो प्रेमाने डॅनी म्हणतो.
हिवाळ्यात या थंड रात्री मुझफ्फरनगर येथील शिव चौकात असलेल्या बाजारपेठेतील कोणत्याही दुकानासमोर तो आपल्या मित्र कुत्र्यासह झोपायचा व रात्री कुत्रा त्याच्या झोपलेल्या मालकाची देखरेख करत आणि दोघं पण एकमेकांची काळजी घेत असत.

काही दिवसांपूर्वी घेतलेल्या मुलाचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील एसएसपी अभिषेक यादव यांनी मुलाला शोधण्यासाठी पोलिसांची टीम लावली. पोलिसांनी त्या मुलाला शहरातून ताब्यात घेतले. आता मुलाचे बाल व महिला कल्याण विभागाच्या देखरेखीखाली सांभाळ केला जात आहे, जिथे त्याच्या वास्तव्यासह जिल्हा प्रशासन देखील चांगल्या शिक्षणाची व्यवस्था करत आहे.