.
फिल्मी दुनियेत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करणारा अर्जुन कपूर अशा स्टार्सपैकी एक आहे जो चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहतो. अर्जुन कपूर आणि मलायका यांचे लव्ह लाईफ अनेकदा लोकांच्या चर्चेचा विषय असते.
मात्र, एका मुलाखतीत अर्जुन कपूरने बॉलिवूडचा प्रिय रणबीर कपूरचा एक किस्सा सांगितला, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. खरं तर, जेव्हा अर्जुन कपूर एका चॅट शोचा भाग बनला तेव्हा त्याला होस्टने एक प्रश्न विचारला, ज्याच्या उत्तरात त्याने एक मजेदार किस्सा सांगितला.
त्याला प्रश्न विचारण्यात आला की, जर त्याला कधी रिलेशनशिपचा सल्ला घ्यावा लागला तर तो कोणाकडून घेशील, रणवीर सिंग की वरुण धवन ? याला उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला होता की, रणवीर सिंग. यावेळी अर्जुन कपूरने रणबीर कपूर कडून एकदा मिळालेला रिलेशनशिपचा सल्ला आणि त्याचे काय परिणाम झाले याविषयीची संपूर्ण घटना सांगितली.
त्याने सांगितले की, मी एकदा रणबीर कपूरकडून नात्याबाबत सल्ला घेतला होता. याचा परिणाम असा झाला की दुसऱ्याच दिवशी माझे त्या मुलीशी ब्रेकअप झाले. याचा पुरावा देताना अर्जुन कपूर म्हणाला की, कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याकडून रिलेशनशिपचा सल्ला घेणे पूर्णपणे निरुपयोगी आहे. हा संपूर्ण प्रसंग सांगताना तो म्हणाला- मी आणि रणबीर बाल्कनीत उभे होतो.
अंधाराकडे बघत रणबीर म्हणाला ‘अगर तू खुश नहीं है, तो जाने दे’ तो क्षण इम्तिहाज अलीच्या चित्रपटासारखा होता आणि दुसऱ्याच दिवशी माझे ब्रेकअप झाले. कारण त्याचवेळी मी माझ्या मैत्रिणीला मेसेज केला आणि सांगितले की आपण दुसऱ्या दिवशीच बोलू आणि ब्रेकअप करू.
याबद्दल मला 7 दिवस पश्चात्ताप झाला. म्हणूनच रणबीर कपूरकडून कधीही रिलेशनशिपचा सल्ला घेऊ नका. अर्जुन कपूरच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘एक व्हिलन 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया हे स्टार्स दिसणार आहेत.