.
अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. आलियाच्या कुटुंबासोबतच तिचे चाहतेही या गुड न्यूजची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आलिया सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे आणि सध्या तो आलियाची पूर्ण काळजी घेत आहे. या चिमुकल्याच्या स्वागताची तयारी दोघांनीही पूर्ण केली आहे. आलिया भट्टच्या डिलिव्हरीशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे.
ऋषी कपूर यांच्याशी संबंध आहे :- मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आई होऊ शकते. अलीकडेच आलिया भट्टची डिलिव्हरी कुठे होणार याचीही माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या हॉस्पिटलमध्ये तिचे सासरे ऋषी कपूर यांच्यावर उपचार करण्यात आले होते आणि जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच हॉस्पिटलमध्ये आलिया भट्ट तिच्या मुलाला जन्म देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री गिरगावच्या एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात मुलाला जन्म देणार आहे.
नावाची झाली नोंदणी :- आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी दिली होती. ही आनंदाची बातमी तीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता बातमी समोर येत आहे की आलिया एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात मुलाला जन्म देणार आहे.
तीच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. रणबीर कपूरचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी अखेरचा श्वासही याच रुग्णालयात घेतला. आलिया आणि रणबीर कपूर नुकतेच ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर भेटले होते, त्यांच्या घरी बेबी शॉवर सेरेमनीही झाली होती.
यात आलिया आणि रणबीरचे कुटुंबीय उपस्थित होते. अभिनेत्रीने तिच्या बेबी शॉवरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले होते. हे वर्ष 2018 होते. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले.
अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी यावर्षी लग्न केले. घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी सर्व कुटुंबीय सज्ज झाले आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार आलिया भट्ट बाळाच्या जन्मानंतर बरेच दिवस काम बंद ठेवणार असून होणाऱ्या बाळाची काळजी घेणार आहेत.