मॅच रंगतदार स्थितीत असतानाच मैदानात झाली एका कुत्र्याची एन्ट्री आणि …बघा विडिओ

विडिओ

। नमस्कार ।

क्रिकेटच्या मैदानात एखादा सामना रंगतदार होत असताना कधी-कधी अशा मजेशीर गोष्टी घडतात की त्यावेळी दोन्ही टीमच्या खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचंसुद्धा मनोरंजन होते. असाच एक प्रकार नुकताच पाहयला मिळाला. यामध्ये  मैदानातील बॉलचा ताबा हा फिल्डरने नाही तर एका कुत्र्यानं घेतला. बॉल तोंडात घेऊन हा कुत्रा मैदानात पळू लागला. त्यानं काही खेळाडूंना त्याच्या मागं पळवलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयर्लंडमधील ब्रेडी क्रिकेट क्लबच्या मैदानात हा प्रकार घडला. ब्रेडी क्रिकेट क्लब आणि सीएसएनआय यांच्यात झालेल्या मॅचमध्ये एक कुत्रा मैदानात आला आणि बॉल तोंडात घेऊन पळू लागला. सामन्यातील ९ व्या शटकामध्ये हा प्रकार घडला. पावसामुळे हा सामना १२ शटकांचा निश्चित करण्यात आला होता.


९ व्या ओव्हरमध्ये एबी लेकीनं फटका मारला आणि ती रन काढण्यासाठी धावली. त्यावेळी विकेट किपर रिचेलनं  तिला रन आऊट करण्याच्या प्रयत्नात ओव्हर थ्रो केला. रिचेलचा थ्रो कोणत्या फिल्डरनं पकडण्याच्या आधीच कुत्र्यानं बॉल तोंडात पकडला आणि तो मैदानात पळत सुटला.

त्यानंतर मैदानातील फिल्डर्ससह एक प्रेक्षक देखील कुत्र्याला पकडण्यासाठी मैदानात पळत होता. अखेर नॉन स्ट्रायकरला उभी असलेली बॅटर फिशरनं कुत्र्याला पकडलं. आयर्लंडच्या महिला क्रिकेटमधील मॅचचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

बघा विडिओ :-

Leave a Reply

Your email address will not be published.