.
बॉलिवूड विश्वातून एका पाठोपाठ एक गुड न्यूज आल्यानंतर आता अंबानी कुटुंबातून देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाने शनिवारी एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामल याच्याशी झाला आहे. लग्नानंतर दोघेही आता जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत.
2018 मध्ये ईशा आणि आनंदचे झाले होते लग्न :- ईशा आणि आनंद 12 डिसेंबर 2018 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तिने वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली.
ऑक्टोबर 2014 मध्ये तिला रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डावर स्थान देण्यात आले. 2020 मध्येच मुकेश अंबानी आजोबा झाले, जेव्हा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता हिने 10 डिसेंबरला मुलाला जन्म दिला. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत.
ईशा अंबानीचे शिक्षण आणि एकूण संपत्ती :- आनंद पिरामल यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचबरोबर ईशाने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बॅचलर डिग्री घेतली आहे. ईशाने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले.
नेट वर्थबद्दल बोलायचे झाले, तर फोर्ब्सने 2018 मध्येच ईशा अंबानीची संपत्ती 70 दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला होता. रिलायन्स ग्रुपमध्ये वडिलांना मदत करण्यापूर्वी ईशानेही काम केले होते. मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून त्यांनी न्यूयॉर्कमध्ये काही काळ काम केले.
2015 मध्ये ईशाला आशियातील 12 सर्वात शक्तिशाली आगामी व्यावसायिक महिलांच्या यादीत स्थान मिळाले. रिलायन्स जिओ हा ईशाचा पहिला मोठा प्रोजेक्ट होता. यानंतर तिने रिलायन्सच्या रिटेल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
AJIO एप्रिल 2016 मध्ये ईशा अंबानीच्या देखरेखीखाली लॉन्च करण्यात आले, जे रिलायन्स ग्रुपचे मल्टी-ब्रँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. आता ईशाने गुड न्यूज दिल्यानंतर अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. इशा अंबानीच्या दोन्ही बाळांचे नाव देखील समोर आले आहेत. पैकी मुलीचे नाव ‘आदिया’ तर मुलाचे नाव ‘कृष्णा’ ठेवण्यात आले आहे.