माणुसकी ! भर उन्हात रस्त्यावर पेरू विकत बसनाऱ्या आज्जीला ‘या’ व्यक्तीने केली अशी मदत की व्हिडीओ बघून तुम्हीही व्हाल भावूक…

बॉलिवूड

.

सुखाचे सोबती प्रत्येकाला असते, पण दु:खाचा साथीदार कोणीच नसतो, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण आजही काही चांगले लोक आपल्या आजूबाजूला आहेत, जे गरजू लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. त्याचे अनेक उदार आणि भावनिक व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होतात. दरम्यान, माणुसकीचा असाच एक व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हायवेवर बसलेली एक आजी आपल्या कुत्र्यासोबत रखरखत्या उन्हात पेरू विकत आहे. तेव्हड्यात एक व्यक्ती तीच्याकडे येते. तो व्यक्ती या आज्जीला पेरूचा दर विचारतो. आजी त्याला 20 रुपये किलो सांगते. मग तो अख्ख्या पेरूची किंमत विचारतो. आजी त्याच्याकडून 50 रुपये मागते.

पण ती व्यक्ती आजीला 100 रुपये देते. आज्जी खूप भावूक होतात. मदत करणाऱ्या व्यक्तीला आजीही खूप आशीर्वाद देतात. @brajeshabpnews नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “श्रीदाता हो तो ऐसा” हा व्हिडिओ अतिशय भावूक आहे. जे लोकांच्या हृदयाला भिडणारे आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आजी पेरू विकताना दिसत आहे. एक अनोळखी व्यक्ती आज्जी बद्दल विचारना करते. तसेच पेरूचा भावही विचारतो. शेवटी तो आजीला 100 रुपये देतो आणि पेरूही घेत नाही. त्या व्यक्तीचे औदार्य पाहून आजी भावूक होतात. त्यानंतर या उदार स्वभावाच्या व्यक्तीला आज्जी आशीर्वाद देते. ती व्यक्ती आज्जीला घरी जाण्यास सांगते.

या व्हिडिओला आतापर्यंत 1.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 19 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 2276 रिट्विट केले गेले आहेत. अनेक युजर्स आपापल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.