‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, बघा असा होईल या मालिकेचा ‘शेवट’…

बॉलिवूड

.

टी व्ही वरील मराठी मालिका सर्वच जण आवडीने बघतात. त्यातच काही मालिका अशा असतात की एकवेळ जेवण नाही करणार पण आपली आवडती मालिका बघण्यास महिला सर्वात पुढे असतात. सध्या सगळीकडे ज्या मालिकेची चर्चा सुरू आहे त्या मालिकेचे नाव आहे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ बऱ्याच वर्षांपासून प्रसिद्धीस असणारी ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली असून ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

ही मालिका खरोखर निरोप घेणार का याबद्धल मात्र प्रेक्षक संभ्रमात आहेत. कूणाचाही विश्वास बसत नाहीये की ही मालिका आता इतक्यात निरोप घेईल म्हणून. आज आपण या लेखातून तेच माहिती करून घेणार आहोत की समोर आलेली माहिती किती टक्के खरी आहेत. एक प्रोमो सादर झाला आहे आणि हा प्रोमो सादर झाल्यानंतर बऱ्याच जणांनी असा समज करून घेतला आहे की आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली आहे.

आणि हा समज देखील तितकाच खरा ठरला आहे. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत एकापेक्षा एक असे क्षण पाहायला मिळत असतानाच मालिकेच्या चाहत्यांसाठी मात्र एक निराश करणारी बातमी समोर आल्याने या मालिकेचे चाहते देखील आता निराश झालेले दिसत आहे. हे खरे आहे की आता यश आणि नेहाच्या प्रेमाची कहानी इथेच संपणार आहे.

ही सर्वांची आवडती मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या अंतिम टप्प्यात नेहा आणि यश यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे क्षण बघण्यास मिळत आहे. नेहाच्या पहिल्या नवऱ्याचे म्हणजेच अविनाशचे खरे रूप समोर आले आणि तो नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य यशाच्या समोर आल्याने यश व नेहाच्या नात्यात दुरावा आला आल्याचे दिसून येत आहे.

हे समजल्यावर आता नेहा तिची मुलगी परी हिला घेऊन दुसरीकडे चाळीत रहाण्यास जाणार आहे. यश व नेहाच्या नात्यातील दुराव्यामुळे परीच्या मनावर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ज्यावेळी परीला तिच्या खऱ्या बाबा विषयी समजल्यावर मालिकेत पुढे काय होईल हे बघायला मिळणार आहे.

यामुळे कोणती नाते दुरावतील या गोष्टी मालिकेच्या अंतिम टप्यात बघण्यास मिळणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या पुढील भागात पाहण्यास मिळणारच आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार झी मराठी वरील ही लोकप्रिय मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातील 17 तारखेला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

याचप्रमाणे या मालिकेतील सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करणारी मुलगी परी म्हणजेच मायरा वैकुंठे हिने मालिकेत नेहाच्या मुलीची भूमिका अतिशय चोखदार पणे निभावली आहे. तीने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने सर्वांचा निरोप घेतल्यानंतर आता त्या जागी दार उघड बये ही नवीन मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येत्या 17 सप्टेंबरला माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत आणि दार उघड बये ही मालिका येत्या 19 सप्टेंबरला सुरू होणार आहे. यावरूनच माझी तुझी रेशीमगाठी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे ठाम झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.