.
आयसीसी अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला १७.१ षटकांत ६८ धावाच करता आल्या. 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या सौम्या तिवारी आणि गोंगडी त्रिशा क्रीजवर आहेत.
संघाने 12 षटकांत 2 बाद 60 धावा केल्या आहेत. भारताची कर्णधार शेफाली वर्मा 11 चेंडूत 15 धावा आणि उपकर्णधार श्वेता सेहरावत 6 चेंडूत 5 धावा करून बाद झाली. इंग्लंडकडून हॅना बेकर आणि ग्रेस सर्व्हन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.
पॉवरप्लेमध्ये 30 धावा केल्या :- पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 5 च्या रन रेटने 30 धावा केल्या. पण, कर्णधार शेफाली वर्मा आणि उपकर्णधार श्वेता सेहरावतच्या विकेट्सही गमावल्या.
शेफाली 15 आणि श्वेता 5 धावा करून बाद झाली. इंग्लंडची कर्णधार ग्रेस सर्व्हेन्स आणि हॅना बेकरने प्रत्येकी एक विकेट घेतली. अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली आहे.
या विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 69 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि टीम इंडियाने तीन गडी गमावून ते पूर्ण केले.