बॉलिवूडच्या ‘या’ हॉ’ट अभिनेत्रीने क्रिकेटपट्टू ‘श्रेयस’ अय्यरला दिली आकर्षक ऑफर, म्हणाली सामना सुरू होण्यापूर्वी माझ्यासोबत…

बॉलिवूड

.

बॉलिवूड मधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे भारतीय क्रिकेट पट्टू सोबत नाव जोडले गेले आहे. त्यातच एका बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेलने भारतीय क्रिकेट पट्टू श्रेयस अय्यरला खूपच आकर्षक ऑफर दिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अय्यर १३ धावांवर बाद झाल्यावर या मॉडेलने स्वतः पोस्ट केली आणि श्रेयसला एक ऑफर दिलीय.

भारतीय संघाचा तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादव जोरदार फॉर्मात आहे. 360 डिग्रीचा फलंदाज कहर करत आहे. सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार शतक झळकावले. त्याचा फॉर्म आणि दमदार फलंदाजीमुळे प्रत्येक गोलंदाज घाबरतो. प्रत्येक फलंदाजाला त्याच्यासारखी फलंदाजी करायची असते. दरम्यान, दुसऱ्या टी-२०मध्ये फ्लॉप ठरलेल्या श्रेयस अय्यरला एका सुंदर अभिनेत्री-मॉडेलने ऑफर दिली आहे.

श्रेयस अय्यरला मिळाली आकर्षक ऑफर :- टीम इंडियाचा आणखी एक फलंदाज श्रेयस अय्यरला ही आकर्षक ऑफर मिळाली आहे. त्याला बॉलीवूडच्या एका मॉडेल-अभिनेत्रीने ऑफर दिली होती की जर त्याने तिच्यासोबत कॉफी घेतली तर तो सूर्यकुमार यादवप्रमाणे शतक करेल.

अश्विनी आहेर असे या मॉडेलचे नाव आहे. अश्विनीने इंस्टाग्रामवर कॉफीचा मग हातात घेऊन एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले – जर श्रेयसने सामन्यापूर्वी माझ्यासोबत कॉफी घेतली असती तर त्याने सूर्यकुमार यादवप्रमाणे शतक केले असते.

सूर्यकुमार हिट, श्रेयस फ्लॉप :- अश्विनीने श्रेयस अय्यरलाही टॅग केले आहे. अय्यरच्या चाहत्यांच्या हे लक्षात आले आणि अनेकांनी त्यांचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ज्या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद १११ धावांची खेळी केली, त्याच सामन्यात श्रेयस अय्यरने ९ चेंडूत एक चौकार आणि एक षटकार ठोकला आणि १३ धावा केल्यानंतर विकेट गमावली.

अश्विनीने श्रेयसला मारले टोमणे :- निघून गेल्यावर तो स्वतःवरच रागावलेला दिसत होता. यानंतरच अश्विनीने श्रेयसचा फोटो शेअर करून त्याची खिल्ली उडवली. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने १९१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत 126 धावांत संपुष्टात आला. भारताकडून दीपक हुडाने सर्वाधिक ४ बळी घेतले तर केन विल्यमसनने सर्वाधिक ६१ धावा केल्या. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.