बाळाने झोपताना घेतली चादर आणि लागला गुदमरायला , आईने ऑफिसमध्ये बसूनच वाचवला बाळाचा जीव

Uncategorized

। नमस्कार ।

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामुळे अनेकदा काही गोष्टी मनाला स्पर्श करून जातात तर काही आनंद. पण या व्हिडिओत तर ऑफिसमध्ये बसलेली आई घरी असलेल्या बाळाकडे कस लक्ष देत आहे, हे कळत आहे. ऑफिसमध्ये काम करत बसलेल्या आईने मोठ्या हुशारीने आपल्या बाळाचा जीव वाचवला आहे. ही घटना चीनच्या शंघाईमधील आहे. जेथे एक आई आपल्या मुलाला पतीच्या देखरेखीखाली सोडून कामावर गेली. तेव्हा चादर घेवून गाढ झोपलेल्या बाळाचा जीव गुदमरला.

या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये  बाळ वडिलांसोबत सोबत झोपलेला आहे. बाळाला चादरीत गुंडाळल्यामुळे त्याचा चेहऱ्यावर चादर येते आणि ते बाळ गुदमरतो. वडील देखील गाढ झोपेत असल्यामुळे त्यांचं लक्ष नसतं. तेव्हा ही धक्कादायक घटना ऑफिसमध्ये असलेल्या आईला सीसीटीव्हीच्या माध्यमातून समजते.

 

पोटच्या गोळ्याचा जीव धोक्यात असल्याचं कळताचं, आईने बाळाच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं की, बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. तेव्हा वडिलांनी चादर बाळाच्या चेहऱ्यावरून काढली. ऑफिसमध्ये बसलेल्या आईच्या प्रसंगावधानमुळे बाळाचे प्राण वाचले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्या महिलेचे कौतुक केले. दूर असून देखील तिने आपल्या मुलाचा जीव वाचवला.  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

फोटो क्रेडिट :- Douyin/xinbeifang)

Leave a Reply

Your email address will not be published.